नाशिक: बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

सिन्नर येथून मित्र अरुण डिके (रा. ब्राम्हणवाडे) याच्यासोबत दुचाकीवरून तो घरी येत असताना रस्त्यावर अचानक 3 बिबटे आडवे आले. त्यातील एका बिबट्याने दुचाकीच्या दिशेने धाव घेत रमेशवर हल्ला केला. त्याच्या पायाला पंजा ओरखडल्याने जखम झाली.

नाशिक : सिन्नर तालुक्यातील मेंढी गावाजवळ शुक्रवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रमेश एकनाथ घुमरे (रा. सांगवी) हा युवक जखमी झाला.

म तर तोल गेल्याने खाली पडल्याने चेहऱ्याला दुखापत झाली. दोघांनीही आरडाओरड केल्याने बिबटे बाजूच्या शेतात पसार झाले.

मेंढी शिवारात गेल्या 2-3 महिन्यांपासून बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ले करून त्यांना जखमी केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वनविभागाने तातडीने प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

Web Title: Marathi news Nashik news leopard attacks youth