साडेतीन वर्षाच्या मुलीसह विवाहीतेची दरीत उडी घेऊन आत्महत्या

दिगंबर पाटोळे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

वणी : शिरवाडे वणी, ता. निफाड येथील विवाहीतीने अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुरडीसह सप्तश्रृंगी गडावरील शीतकड्यावरुन सुमारे चारशे फुट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. 

वणी : शिरवाडे वणी, ता. निफाड येथील विवाहीतीने अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुरडीसह सप्तश्रृंगी गडावरील शीतकड्यावरुन सुमारे चारशे फुट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. 

शिरवाडे वणी येथून मंगळवार, ता. ९ पासून घरातून बेपत्ता झालेल्या कांचन विलास निफाडे (वय ३१) व ईश्वरी विलास निफाडे (वय 3) यांचा काल सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान शीतकड्या पासून सुमारे चारशे फुट खोलीवरील कड्याच्या टप्प्यावर मृतदेह आढळला आहे. शीतकडयावरून काही भाविक व पर्यटक खालील दरीचा फोटो घेत असताना कोणीतरी तरी पडले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबतची माहिती सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट कार्यालयात कळवली. दरम्यान कळवण पोलिसांनी घटनेची खातरजमा करुन सदरचे क्षेत्र वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने वणी पोलिसांत कळविले. दरम्यान सदरचा भाग जंगलाचा व उंचावर असल्याने पोलिसांनी भातोडे येथील पंधरा वीस स्थानिक आदिवाशींच्या मदतीने आई व मुलीचा मृतदेह उंचावर अडकलेला मृतदेह काढला. दरम्यान रात्री उशीरा येथील ग्रामिण रुग्णालयात मृतदेह आणला असता. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. दरम्यान रात्री उशीरा पर्यंत दोन्हीही मृतदेहांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत वणी पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Marathi news nashik news mother suicide with 3 years daughters

टॅग्स