कांद्याच्या भावात 400 रुपयांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

नाशिक : देशाला कांदा पुरविणाऱ्या महाराष्ट्रातील कांद्याच्या भावातील घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर किमान निर्यात मूल्य टनाला 700 डॉलरवरून शून्य करण्यात आले. या निर्णयानंतर 24 तासांत कांद्याच्या भावात क्विंटलला 400 रुपयांनी वाढ झाली.

कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडे बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, सिंगापूर, दुबई, श्रीलंकेत निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मागणी सुरू झाली. पिंपळगाव बसवंतमध्ये आज एक हजार ते दोन हजार 111 आणि सरासरी एक हजार 701 रुपये क्विंटल या दराने कांद्याची विक्री झाली.

29 जानेवारीला हेच भाव एक हजार 600 ते दोन हजार 751 आणि सरासरी दोन हजार 251 रुपये होते. यापूर्वी क्विंटलभर कांद्याच्या भावात शंभर ते दोनशे रुपयांनी घसरण व्हायची; पण केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदर भावातील घसरण 500 रुपयांहून अधिक सुरू झाली होती. विंचूर, चांदवडमध्ये शुक्रवारच्या (ता. 2) तुलनेत आज क्विंटलला 400 रुपयांहून अधिक भाव मिळाला. 

Web Title: marathi news Nashik News Onion prices Onion Market