बुद्धिमत्तेला कधीच आरक्षणाची गरज नसते - डॉ. राजेंद्र भारुड

marathi news nashik news program award
marathi news nashik news program award

सटाणा - 'बुद्धिमत्तेला कधीच आरक्षणाची गरज नसते. आरक्षणाच्या फंद्यात न पडता जिद्द, चिकाटी व ध्येयनिश्चित करुन अभ्यास केल्यास कोणतीही परीक्षा चांगल्या गुणांनी सहजच उत्तीर्ण होता येते', असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी येथे केले. येथील आय न्यूज या वृत्तवाहिनीतर्फे आयोजित 'देवमामलेदार यशवंत गौरव' पुरस्कार वितरण सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना डॉ. भारुड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे ग्रंथालय संचालक आशिष ढोक तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे, शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र पाटील, माजी आमदार संजय चव्हाण, नगराध्यक्ष सुनील मोरे, देवमामलेदार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, एड.विजयबापू पाटील, मविप्र संस्थेचे माजी उपसभापती नानाजी दळवी, डॉ. दिग्विजय शहा, शिवसेनेचे लालचंद सोनवणे आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना अभिनेते महेश कोठारे म्हणाले, युवा पिढीला मार्गदर्शक ठरणाऱ्या डॉ. भारुड यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी ऐकून मी भारावलो आहे. लवकरच त्यांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचेही श्री. कोठारे यांनी जाहीर केले. 
अभिनेते महेश कोठारे यांच्या हस्ते मुंबई येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे उपायुक्त गोकुळ देवरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पुणे येथील विक्री व कर अधिकारी नीलम भामरे यांचा देवमामलेदारांची मानाची पगडी परिधान करीत 'देवमामलेदार यशवंत गौरव' पुरस्कार व स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपायुक्त गोकुळ देवरे विक्रीकर अधिकारी नीलम भामरे यांचीही भाषणे झाली. सेवानिवृत्त उपप्राचार्य बी. जे. शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. आय न्यूज वृत्तवाहिनीचे संचालक देवेंद्र वाघ यांनी यशवंत गौरव पुरस्कार सोहळ्याचा उद्देश स्पष्ट करीत पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, माजी सभापती रामकृष्ण अहिरे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते युवराज पवार, नितीन सोनवणे, आर. व्ही. देवरे, बी. व्ही. देवरे, मुरलीधर देवरे, पुष्पा पाटील, मनीषा अहिरे, आर. डी. भामरे, दीपक देवरे, पी. एस. सूर्यवंशी, रमेश देवरे, नगरसेवक महेश देवरे, राहुल पाटील, संगीता देवरे, शंकरराव सावंत, डॉ. किरण अहिरे, कल्पना पाटील, प्रमोद राका, सरपंच लक्ष्मण मांडवडे, चंद्रशेखर वाघ, योगेश अहिरे, गोरख बच्छाव, संदीप जगताप, प्राजक्ता गरुडकर, नंदकिशोर शेवाळे आदींसह शहर व तालुक्यातील शासकीय कर्मचारी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा. जितेंद्र मेतकर व पत्रकार शशिकांत कापडणीस यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com