वाघेरे फाट्यावर ट्रकची क्रुझरला धडक ; 12 जखमी

Nashik News Road Accident 12 Injury
Nashik News Road Accident 12 Injury

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर-जव्हार या मार्गावरील घाट रस्त्यावरील वाघेरे फाटा येथे भरधाव वेगातील ट्रकने समोरून येणारे प्रवासी क्रुझर चारचाकी वाहनाला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दोन चिमुकल्यासह 12 जण जखमी झाले तर चालक गंभीर जखमी आहे. जखमींना रुग्णवाहिकेतून नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ट्रकचालकास हरसूल पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी गिरणारे येथून देवीचे दर्शन घेऊन क्रुझर चारचाकी वाहनातून वटकपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील सुमारे 15 पेक्षा अधिक प्रवासी परत वटकपाडयाकडे जात होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घाट रस्त्यावरील वाघेरा फाटा येथे अपघाती वळणावर भरधाव वेगात आलेल्या ट्रकने क्रुझरला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये क्रुझरचा चालक लक्ष्मण गिरे गंभीर जखमी झाला तर 11 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पाच महिला, 2 चिमुकल्यांचा समावेश आहे. 

घटनेची माहिती मिळताच तात्काळ 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधून नागरिकांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. गंभीर जखमी असलेला चालक लक्ष्मण गिरे यास अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. तर दोन चिमुकल्यांना कृत्रिक ऑक्‍सिजन लावण्यात आले. 

जखमींच्या डोक्‍याला आणि हातापायाला गंभीर मार लागला आहे. याप्रकरणी हरसूल पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. 

लक्ष्मण गरे (गंभीर), पिंट्या जनार्दन बुधर, यमुना भिका गभाले, गंगू नामदेव लोखंडे, मीराबाई किसन लाखन, रवी किसन लाखन, भीका गभाले, महेंद्र लोखंडे, राहुल किसन लाखन, संगीता तुळशीराम वारले, निर्मला जनार्दन बुधर, रवी लाखन अशी जखमींची नावे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com