नांदगाव ते मनमाड रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त

संजीव निकम
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

मन्याड नदीवरील जुना पूल कडून टाकण्यात येणार असून त्याजागेवर चौपदरी वाहतुकीसाठीचा नवा पुलाला मंजुरी मिळाली आहे. गंगाधरीपासून नव्या तहसीलपर्यंत दुभाजाकासह चौपदरी रस्ता असणार आहे. नांदगाव ते चांदवड पर्यंतच्या चौथ्या टप्प्यातील डीपीआर च्या मंजुरीचा प्रस्ताव देखील अंतिम टप्प्यात असल्याने जळगाव ते चांदवड या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्न पूर्ण होवू घातले असल्याने जळगाव नाशिकमधील अंतर कमी होत जावून दळणवळणाची साधने वाढीला लागणार आहेत. 

नांदगाव : वर्षानुवर्षे नादुरुस्त झालेल्या नांदगाव ते मनमाड या चोवीस किलोमीटरच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त लागल्याने नांदगावकर सुखावले आहेत. शिवाय केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने जळगाव ते चांदवड पर्यंतच्या दहा मीटर रुंदीच्या नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या डीपीआरला अगोदरच मंजुरी दिल्याने वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या नांदगाव तालुक्याला या निमित्ताने दळणवळणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास लाभ होवू घातला आहे.

दरम्यान चाळीसगाव ते नांदगाव दरम्यानच्या तिसऱ्या टप्प्यातील डीपीआरसाठी दिल्लीला केंद्रीय वाहतूक मंत्रालयात येत्या सोळा फेब्रुवारीला बैठक आयोजित करण्यात आली आहे. येत्या सप्ताहात खासदार हरिचंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे उपभियांता सी आर सोनवणे यांनी सकाळला दिली. चाळीसगाव ते नांदगाव या ४४ किलोमीटरच्या अंतरासाठी १६७ कोटी ६९ लाख रुपयाची वित्तीय मंजुरी देखील यानिमित्ताने मिळाली आहे. सध्या केंद्र शासनाच्या रस्ते विषयक निकषानुसार शहरातून जाणाऱ्या रस्त्याची सध्याच्या अरुंद रस्त्याचा विचार करता नियोजित रस्त्यातली रुंदी कमी होणार असून त्यापुढे बस स्थानकापासून सुरु ते गंगाधरी गावाच्या बाह्यवळण रस्त्यापर्यंत दुभाजाकासह पर्यंत चौपदरी रस्ता राहणार आहे.

मन्याड नदीवरील जुना पूल कडून टाकण्यात येणार असून त्याजागेवर चौपदरी वाहतुकीसाठीचा नवा पुलाला मंजुरी मिळाली आहे. गंगाधरीपासून नव्या तहसीलपर्यंत दुभाजाकासह चौपदरी रस्ता असणार आहे. नांदगाव ते चांदवड पर्यंतच्या चौथ्या टप्प्यातील डीपीआर च्या मंजुरीचा प्रस्ताव देखील अंतिम टप्प्यात असल्याने जळगाव ते चांदवड या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्न पूर्ण होवू घातले असल्याने जळगाव नाशिकमधील अंतर कमी होत जावून दळणवळणाची साधने वाढीला लागणार आहेत. 

दरम्यान, नांदगाव शहरातील रेल्वे नाक्यापासून च्या डांबरी करणाच्या कामाला प्रारंभ झाला असून, मनमाड शहराच्या मालेगाव चौफुली पर्यंतच्या तेरा कोटी ९१ लाख रुपयाच्या पंचवीस किलोमीटरच्या अंतरापर्यंत साईड पट्ट्या व डागडुजी सह नव्याने डांबरीकरण करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हा राज्यमार्ग हस्तांतरित झाल्यामुळे रस्त्याची खड्डे बुजविण्यासाठी निधीची मोठी कमतरता भासत होती आता डांबरीकरण मुळे गेल्या काही वर्षापासून ची झालेली दैना संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.

Web Title: Marathi news Nashik news road work in Nandgaon