रोटरी क्लब ऑफ बागलाणच्या रोटरॅक्ट सदस्यांनी अपंग कल्याण केंद्रास भेट

रोशन खैरनार
रविवार, 4 मार्च 2018

रोटरी क्लब ऑफ बागलाण अंतर्गत सटाणा महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवीच्या रोटरॅक्ट सदस्यांनी सामाजिक बांधिलकीतून येथील निवासी अपंग (दिव्यांग) कल्याण केंद्राला भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री.बच्छाव बोलत होते.

सटाणा : दिव्यांग विद्यार्थी सर्व क्षेत्रात प्रगती करू शकतात. मैलाचा दगड गाठू शकतात. फक्त त्यांना एका संधीची आवश्यकता असते. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबसोबत समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बागलाणचे सचिव प्रदीप बच्छाव यांनी येथे केले.

रोटरी क्लब ऑफ बागलाण अंतर्गत सटाणा महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवीच्या रोटरॅक्ट सदस्यांनी सामाजिक बांधिलकीतून येथील निवासी अपंग (दिव्यांग) कल्याण केंद्राला भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री.बच्छाव बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे संस्थापक डॉ. प्रकाश जगताप, अध्यक्ष डॉ.उमेश बिरारी, बी. डी. बोरसे आदी उपस्थित होते. श्री.बच्छाव म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांना निसर्गाने अन्याय न करता जे व्यंग दिलेले आहे त्या मोबदल्यात एक असामान्य शक्तीही दिलेली असते. या जाणिवेतून समाजातील घटकांनी या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे. त्या विद्यार्थ्यांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. रोटरी क्लबसोबत समाजानेही दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा.

महाविद्यालयाच्या रोटरॅक्ट सदस्यांनी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. भविष्यातील त्यांच्या इच्छा - आकांक्षांवर चर्चा केली, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्पक आणि जिद्दी वृत्तीला सलाम करीत जीवनात कधी हार मानायची नाही आणि जीवनात कधीही कोणत्याही परिस्थितीत नेहमी आनंदी राहायचं असा संदेश रोटरॅक्ट सदस्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. क्लबतर्फे अपंग कल्याण केंद्रास प्रथमोपचार पेटी व गोष्टींची पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रमास उपप्राचार्य शांताराम गुंजाळ, प्रा.राजेंद्र वसईत, केंद्राचे प्राचार्य ए.जी. धोंडगे, अधीक्षक सविता गिरी, रोटरॅक्ट क्लब ऑफ सटाणा बागलाणच्या अध्यक्ष वृषाली गांगुर्डे, सचिव अक्षदा सूर्यवंशी, डॉ.मनोज शिंदे, डॉ.अमोल पवार, मनोज जाधव, रामदास पाटील, बी.के. पाटील, डॉ.अंजली जगताप, कल्पना पंडित, ज्योती जाधव, तृप्ती सोनवणे, अभिजित सोनवणे, महेश सूर्यवंशी, जगदीश कुलकर्णी, प्रशांत भामरे, नितीन मगर, उमेश सोनी, योगेश अहिरे आदींसह महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र व रसायनशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: marathi news nashik news rotary club