सटाणा ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालय बनले असुविधांचे केंद्र

रोशन खैरनार
मंगळवार, 30 जानेवारी 2018

सटाणा : येथील ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालय असुविधांचे केंद्र बनले असून एकूणच कामकाजात सावळा गोंधळ दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवा रामभरोसे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या सर्व त्रुटी तात्काळ दूर करून सुरळीत व परिणामकारक आरोग्य सेवा न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी काल (ता. 29) दिला आहे. 

याबाबत 'सकाळ'शी बोलताना आमदार चव्हाण म्हणाल्या, 26 जानेवारीस अचानकपणे ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर दिसून आली. ट्रामा केअर सेंटरच्या नुकत्याच बांधकाम झालेल्या इमारतीचा स्लॅब अनेक ठिकाणी पडून आला आहे. तर ठिकठिकाणी पाण्याची गळती सुरु आहे. या इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. नव्याने थाटलेल्या अद्ययावत अशा ऑपरेशन थिएटरमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या सर्व बाबींची थेट डागडुजीसह वैद्यकीय सेवा सुरळीत मिळावी. ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत जुनी इमारत आहे. ती धोकादायक इमारत पडून ग्रामीण रुग्णालय परिसर सुशोभित करावा. या इमारतीचा निर्लेखन प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सकांना तातडीने द्यावा. शासनाने सुरु केलेली १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा फक्त सटाणा ते मालेगाव अशी सुरु आहे. ती सेवा नाशिकपर्यंत सुरु व्हावी, यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणार आहे.

ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयातील असुविधा सोडविण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक येत्या 3 फेब्रुवारीस आयोजित करावी. चर्चेअंती प्रश्न मार्गी लागणार नसेल तर यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा संतप्त इशाराही आमदार चव्हाण यांनी यावेळी दिला आहे. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उषा भामरे, शमा दंडगव्हाळ, नगरसेविका सुरेखा बच्छाव आदी उपस्थित होते. 

Web Title: Marathi news nashik news satana trama care center and rural hospital in bad condition