स्काउट आणि गाईडचे जनक लॉर्ड बेडेन पॉवेल यांची जयंती साजरी

रोशन खैरनार
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

सटाणा (नाशिक) : येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्काउट आणि गाईडचे जनक लॉर्ड बेडेन पॉवेल यांची जयंती आज गुरुवारी (ता.22) चिंतन दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव होते. 

सटाणा (नाशिक) : येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्काउट आणि गाईडचे जनक लॉर्ड बेडेन पॉवेल यांची जयंती आज गुरुवारी (ता.22) चिंतन दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव होते. 

गटशिक्षणाधिकारी बच्छाव व प्राचार्या श्रीमती एस.बी.मराठे यांच्या हस्ते लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना बच्छाव म्हणाले, स्काउट आणि गाईडच्या माध्यमातून लॉर्ड बेडेन पॉवेल यांनी युवकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न केला आहे. स्काउट आणि गाईड उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याविषयी प्रेरणा मिळत असते.

प्राचार्या श्रीमती मराठे यांनी शाळेत घेण्यात येणाऱ्या गाईडच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ख़ुशी ठोके हिने बच्छाव तर अपेक्षा नेरकर हिने प्राचार्या मराठे यांना गाईडचा स्कार्फ प्रदान केला. यावेळी गीतमंचच्या विद्यार्थिनींनी सर्वधर्मसमभाव ही प्रार्थना सादर केली. कार्यक्रमास एम.बी.सोनवणे, यु.डी.गांगुर्डे, एस.ए.गावित, बी.जे.पवार, जे.एम.जाधव, एम.पी.अहिरे, आर.एस.देवरे, ए.जे.पवार, एस.जी.अहिरे, एम.एम.पगार, सी.ए.वाघ, रमाकांत भामरे, डी.बी.सोनवणे, एस.एन.सोनवणे, सचिन शेवाळे, बी.डी.पाटील, डी.पी.खरे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 

येथील मविप्र संचलित अभिनव बालविकास मंदिर प्राथमिक शाळेत भारतीय स्काउट गाईडचे जनक लॉर्ड बेडेन पॉवेल यांची जयंतीनिमित्त आज जेष्ठ शिक्षिका के.आर.अहिरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. एम.एस.पाटील यांनी बेडेन पॉवेल यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. 
 

Web Title: Marathi news nashik news scout guide lord beden panel birth anniversary