सोनई हत्याकांड: 6 आरोपी दोषी, 18 जानेवारीला शिक्षेची सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

अशोक फलके यास जामीन 
याप्रकरणी 7 जनांपैकी 6 जण दोषी ठरले, तर अशोक फलके याच्या विरोधात पुरावे न मिळाल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे त्याची 25 हजार रुपयाच्या जामिनावर सोडण्यात आले

नाशिक : सोनई (जि. अहमदनगर) येथील प्रेमप्रकरणातून तिहेरी हत्याकांडाच्या खटल्यात आज (ता.15) 7 पैकी 6 जणांना दोषी ठरविण्यात आले. तर अंतिम निकाल येत्या गुरुवारी (ता 18) दिला जाणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली तर, सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कामकाज पाहिले.

अशोक फलके यास जामीन 
याप्रकरणी 7 जनांपैकी 6 जण दोषी ठरले, तर अशोक फलके याच्या विरोधात पुरावे न मिळाल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे त्याची 25 हजार रुपयाच्या जामिनावर सोडण्यात आले.

फाशी कि जन्मठेप
सहा आरोपीना येत्या गुरुवारी शिक्षा सुनावली जाणार आहे, यात आरोपींना फाशी होते की जन्मठेप याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

..घटना....
सोनई (जि.अहमदनगर) येथील गणेशवाडी शिवारात सदरची घटना 1 जानेवारी 2013 रोजी घडली होती. सदर मुलगी नेवासा फाट्यावरील त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बी.एड.चे शिक्षण घेत होती. संस्थेत शिपाई कामगार असणाऱ्या सचिन सोहनलाल घारू व तिची ओळख होऊन त्याचे प्रेमात रूपांतर झाले. याची कुणकुण तिच्या कुटूंबियांना लागताच तिचे वडील व गुन्ह्यातील संशयित पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले (चुलते), गणेश उर्फ प्रविण पोपट दरंदले (भाऊ), संदिप माधव कुल्हे (मावसभाऊ), नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील शौचालयाचे सेफ्टी टॅँक दुरूस्तीचा बहाणा करून वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना वस्तीवर बोलावून घेत, त्यानंतर संदीप थनवार याचा सेफ्टी टॅंकच्या पाण्यामध्ये बुडवून तर पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहूल कंडारे याचा कोयत्याने आणि सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्यामध्ये अडकवून निर्घृणपणे तिहेरी हत्याकांड घडले होते. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सदरील खटल्याचे कामकाज नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. 

Web Title: Marathi news Nashik news Sonai murder case court verdict