इंधनदरवाढी विरोधात शिवसेनेच्या  चक्‍काजाम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जानेवारी 2018

नाशिक : सातत्याने वाढत्या इंधनाच्या दराचा निषेध करण्यासाठी शिवसेनेतर्फे आज चक्‍का जाम आंदोलन पुकारले होते. वरदळीच्या द्वारका परीसरात शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रस्ता अडवत पेट्रोल, डिझेल दर वाढीचा निषेध नोंदविला. दरम्यान या आंदोलनामुळे नाशिक-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतुकीसह शहरात जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुक व्यवस्था ठप्प झाले असून द्वारका परीसर हॅंग झाला आहे. 

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह आमदार योगेश घोलप व अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. द्वारका चौकात ठाण मांडताना जोरदार घोषणाबाजी केली. भगवे झेंडे दाखवत केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामुळे पोलिसांना वाहतुक बंद करावी लागली आहे. वाहतुक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याने मुंबई आग्रा महामार्गावर तसेच नाशिक-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. तर नाशिकरोडकडून मुख्य शहरात येण्यासाठी नागरीकांची गैरसोय झाली असून लांबच्या मार्गाचा पर्याय निवडावा लागतो आहे. महाराष्ट्र वाहतुक सेनेनेदेखील या आंदोलनाला समर्थ दर्शवत सहभाग नोंदविला आहे. दरम्यान अचानक झालेल्या वाहतुक कोंडीमुळे वाहनचालकांची मात्र मोठी गैरसोय होते आहे.

Web Title: Marathi news nashik news strike