कान पिळणाऱ्या शिक्षिकेविरोधात तक्रार         

राजेंद्र बच्छाव
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

नाशिक : इंदिरानगर येथील वडाळा-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या नाशिक केंम्ब्रिज शाळेच्या बालवाडीच्या विद्यार्थ्यांना रंगपेटी आणली नाही म्हणून संतापात या विद्यार्थ्याचा कान पिळून दुखापत करणाऱ्या शिक्षिकेला पालकांच्या तक्रारीनंतर निलंबीत करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार पार्थ केतन गुंजाळ हा बालक शाळेच्या सिनीअर केजी मध्ये शिकतो. काल (ता.७) चित्रकलेच्या तासाला त्याने रंगपेटी आणली नाही म्हणून शिक्षिका अंतरा बॅनर्जी यांनी रागाच्या भरात त्याचा कान पिळला. घरी गेल्यानंतर त्याने पालकांना कान दुखत असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी लक्ष दिले नाही.

नाशिक : इंदिरानगर येथील वडाळा-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या नाशिक केंम्ब्रिज शाळेच्या बालवाडीच्या विद्यार्थ्यांना रंगपेटी आणली नाही म्हणून संतापात या विद्यार्थ्याचा कान पिळून दुखापत करणाऱ्या शिक्षिकेला पालकांच्या तक्रारीनंतर निलंबीत करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार पार्थ केतन गुंजाळ हा बालक शाळेच्या सिनीअर केजी मध्ये शिकतो. काल (ता.७) चित्रकलेच्या तासाला त्याने रंगपेटी आणली नाही म्हणून शिक्षिका अंतरा बॅनर्जी यांनी रागाच्या भरात त्याचा कान पिळला. घरी गेल्यानंतर त्याने पालकांना कान दुखत असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. काही वेळानंतर त्याने पुन्हा तक्रार केल्यानंतर त्याचा कान काळा-निळा पडलेला आणि सूजलेला दिसल्याने पालकांनी त्याला काय झाले असे विचारले असता त्याने झालेला प्रकार सांगितला.

पालकांनी त्याला डॉक्टरांकडे नेले असता कोवळे वय आहे. त्यामुळे कान पिळल्याने येथील रक्त जांभळले असून त्यामुळे कानाचा रंग बदलल्याचे सांगितले. मात्र मुलगा भयभीत झाल्याने शाळेत जाण्यास नकार देऊ लागला. त्यामुळे आज सकाळी पालकांनी शालेय व्यवस्थापनाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करतो असे सांगितल्यानंतर त्यांना विश्‍वस्त राहुल रामचंद्रन आणि भारती रामचंद्रन यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांना देखील तक्रारीत तथ्य असल्याचे नजरेस आल्याने संबंधित शिक्षेकेला लगेच बोलावून शाळेत नोकरीला लागतांना मान्य केलेल्या अटी शर्तीनुसार विद्यार्थ्यांना या प्रकारची शिक्षा देणे नियमबाह्य असल्याची जाणीवकरून देत त्या अंतर्गत असलेल्या तरतूदीनुसार पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबीत करत असल्याचे पत्र देण्यात आले. 

दरम्यान नाशिकरोडची घटना ताजी असतांना या ठिकाणी हा प्रकार घडल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली असून शालेय व्यवस्थापनांनी शिक्षकांना उपरोक्त बाबींबाबत काळजी घेण्यास सांगितले पाहीजे अशी मागणी केली जात आहे. मुलाचे वय बघता ही शिक्षा त्याच्या मनात शाळेविषयी भिती निर्माण करणारी ठरल्याने तक्रार करावी लागली. सुरवातीला विश्‍वस्तांना भेट देण्याची परवानगी मिळत नव्हती. मात्र ती मिळाली आणि त्यांनी देखील तक्रारीचे गांभिर्य समजावून घेतल्यानंतर लगेच कारवाई केले त्यामुळे समाधानी असलो तरी असे प्रकार घडू नयेत असे वाटते, असे पार्थचे पालक केतन गुंजाळ यांनी सांगितले. 

 

Web Title: Marathi news nashik news teacher violence