ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

नाशिक - हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गुरुवारी (ता. 15) जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी अत्यंत किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

जिल्ह्यात सध्या द्राक्ष अंतिम टप्प्यात आली आहेत. ढगाळ वातावरणामुळे त्यावर मिलीबग व मुलीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच, लाल कांदा अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय रब्बीतील गहू, हरभरा ही पिकेदेखील काढणीला आलेली असल्यामुळे पाऊस आल्यास त्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. आज जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यातच सटाणा, चांदवड आदी तालुक्‍यांमध्ये काही ठिकाणी अत्यंत किरकोळ स्वरूपात पाऊस पडल्याचे वृत्त आहे. 

Web Title: marathi news nashik news weather farmer