'शिक्षण स्नेही' वेबसाईटचे उद्घाटन

दिगंबर पाटोळे
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

'शिक्षण स्नेही' या वेबसाईटचे उद्घाटन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सचिव प्राची साठे यांच्या हस्ते करण्यात आले.

वणी (नाशिक) - धोंडेगांव, ता. नाशिक जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे पदवीधर प्राथमिक शिक्षक संजय येशी यांनी तयार केलेल्या 'http://shikshansnehi.com' शैक्षणिक वेबसाईटचे उद्घाटन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सचिव प्राची साठे यांच्या हस्ते करण्यात आले.

नाशिक येथील संदीप फाउंडेशन येथे संपन्न झालेल्या 'राज्यस्तरीय शिक्षणाची वारी' या कार्यक्रमावेळी संजय येशी या पदवीधर प्राथमिक शिक्षकाने तयार केलेल्या 'शिक्षण स्नेही' या वेबसाईटचे उद्घाटन प्राची साठे यांनी करीत ऑनलाईन शिष्यवृत्ती टेस्टची पाहणी केली. मुले स्वतः मोबाईल वर याचा सराव करु शकतात. या वेबसाईटचा विद्यार्थ्यांना उपयोग होऊ शकतो. येशी सर यांचे कौतुक प्राची साठे यांनी केले. या वेबसाईटमध्ये इयत्ता ५ वीची आँनलाईन टेस्ट, अवकाश वेध, जुने मराठी ग्रंथ, मराठी शब्द कोश, राज्य देश व जगाचा नकाशा, सुविचार, दिनविशेष, दैनिक पेपर, शिक्षण विभागाचे जी. आर, लेक वाचवा, देश वाचवा, बेची बचाव आदी शैक्षणिक व्हिडीओ तसेच इयत्ता १ ते ८ वी पाठ्यपुस्तकांचा समावेश असल्याची माहिती संजय येशी यांनी यावेळी दिली. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी किरण कुंवर, निफाडच्या सरोज जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: marathi news nasik educational website inauguration