कसमादे परिसरात तिपटीने कांद्याच्या क्षेत्रात वाढ

खंडू मोरे 
रविवार, 14 जानेवारी 2018

खामखेडा (नाशिक) - कसमादे परिसरात यंदा गत पाच वर्षीच्या तुलनेत रब्बीतील  
हरबरा व मक्‍याचे क्षेत्र घटले असून, उन्हाळ कांद्याचे क्षेत्र मात्र वाढले आहे. यंदा उन्हाळ तसेच खरीपातील व लेट खरीप कांद्यास चांगला बाजारभाव टिकून ​असल्याने अपेक्षित 
लागवडीचा टप्पा ओलांडताना दुपट्टीने कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

खामखेडा (नाशिक) - कसमादे परिसरात यंदा गत पाच वर्षीच्या तुलनेत रब्बीतील  
हरबरा व मक्‍याचे क्षेत्र घटले असून, उन्हाळ कांद्याचे क्षेत्र मात्र वाढले आहे. यंदा उन्हाळ तसेच खरीपातील व लेट खरीप कांद्यास चांगला बाजारभाव टिकून ​असल्याने अपेक्षित 
लागवडीचा टप्पा ओलांडताना दुपट्टीने कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

 कांद्याचे माहेरघर म्हणून नाशिक जिल्ह्यात कसमादेची ओळख आहे. मागील वर्षी उन्हाळ कांद्याच्या इतर राज्यातील घटलेल्या उत्पादनामुळे महाराष्ट्रातील कांद्याला चांगला बाजार भाव मिळाला व परतीच्या पावसाने कसमादे भागात चांगला पाऊस झाल्याने खरीपातील लाल कांद्याची नासाडी झाली. यामुळे हंगामभर कांद्याला बाजार टिकून राहिल्याने साहजिकच कसमादे परिसरात यावर्षी उन्हाळ कांद्याची दिड लक्ष हेक्टरवर अशी रेकॉर्ड तोड लागवड झाली आहे. कसमादे परिसरात २०१३ मधील गारपीट झाल्यानंतर गेल्या पाच वर्षात चालू वर्षी शेतकऱ्यांनां कांद्याने चांगला हात दिला आहे. उन्हाळ कांद्याला देखील चांगला बाजार मिळाला व त्यानंतर खरीपातील लाल व लेट खरिपाला देखील चांगला बाजार मिळत असल्याने हा भाग कांदामय झालेला पहावयास मिळत आहे. कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा या तालुक्‍यांत यावर्षी चांगला पाऊस झाल्याने व कांद्यामुळे शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळाल्याने या चार तालुक्यात रेकॉर्डतोड लागवड झाली आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत उन्हाळ कांदा लागवडीचे चित्र पहावयास मिळत आहे. २०१५ ते २०१६ यावर्षी देवळा, बागलाण, मालेगाव व कळवण या तालुक्यात ४३ हजार हेकटरवर उन्हाळ कांद्याची लागवड झाली होती. २०१६ ते २०१७ या वर्षी ६१ हजार हेकटरवर लागवड झाली होती. तर यावर्षी कसमादे परिसरात मागील पाच वर्षाच्या तुलनेत तिपटीने कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. 

गतवर्षी कसमादे परिसरात रब्बी गहू, हरबरा व मका, इतर तृणधान्यांचा ४६ हेक्‍टरवर पेरा झाला होता. यंदा तो ६० ते ६५ हजार हेक्‍टरवर अडकला आहे. यावर्षी वसाका साखर कारखाना सुरळीत सुरु होऊनही कांद्याला चांगला बाजारभाव असल्याने शेतकऱ्यांनी उसाची लागवड कमीच प्रमाणात केली आहे. कसमादे भागात पाऊस देखील चांगला झाल्याने व कांद्याला अद्यापही चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी कांद्याकडे वळला आहे. त्यामुळे यावर्षी कांद्याचे सर्वच तालुक्यात क्षेत्र वाढले असल्याचे देवळातील तालुका कृषी अधिकारी संजय गुंजाळ यांनी सांगितले. 

Web Title: marathi news nasik onion production