नाशिकरोड रेल्वे स्थानकाला मालवाहतूकीची लॉटरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

नाशिक : माल वाहतूक हा रेल्वे प्रशासनाचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत. पण आतापर्यत कृषी मालवाहतूकीशिवाय इतर मोठ्या वाहतूकीची कामे नसणाऱ्या नाशिक रोड रेल्वे स्थानकाला वाटच पहावी लागते असे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात मात्र जिंदाल स्टील या कंपनीच्या स्टील वाहतूकीचे सुमारे 90 लाखांचा महसूल देणारे काम मिळाल्याने स्थानकाला ही लॉटरी लागली आहे. 

जिंदाल स्टील कंपनीच्या माल वाहातूकीचे मोठे काम मिळाले आहे. ज्यात कंपनीचे नाशिक रोड ते धुलिजन 2897 किलोमीटर 2774 टन लोंखडी साहित्य वाहून नेण्याचे हे काम आहे. ज्यापोटी रेल्वेला 91 लाख 91 हजार 989 रुपये माल वाहतूक भाडे मिळणार आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवजड माल वाहतूकीचे हे पहिलेच काम आहे. नाशिक रोडला सिमेंट, खते आणि धान्याची मालवाहतूक रेल्वेद्वारे होते. पण एकाच मालवाहातूकीच्या कामापोटी थेट 90 लाखांचे रेल्वे भाडे मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याने नाशिक रोड स्थानकाच्या मालवाहतूक विभागाच्या दृष्ट्रीने ही मार्चमधील लॉटरी आहे. 

50 लाखांची बचत 
जिंदाल स्टील कंपनीला 2774 टनाचा लोंखडी साहित्य 2897 किलोमीटर लांबच्या प्रवासासाठी रस्ते वाहतूकीचा पर्याय निवडला असता तर किमान 1 कोटी 40 लाखाचा भाडे खर्च द्यावा लागला असता. याशिवाय रस्ते वाहातूकीत जोखमही होती. पण रेल्वेने मालवाहातूकीमुळे जिंदाल कंपनीचा सरासरी 50 लाखांचा लाभ होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कंपनी आणि नाशिक रोड रेल्वे स्थानक अशा दोहोसाठी लाभदायक असाच हा सौदा ठरला. 
 
प्रवासाचे अंतर 2897 कि.मी. 
वजन ः 2674 टन 
भाडे ः 87 लाख 54 हजार 275 
सीएसटी ः 4 लाख 37 हजार 713

Web Title: marathi news nasik road railway station