राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या निगराणीत पंतप्रधान मोदींच्या सभेची तयारी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

जळगाव : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी (ता. 13) जळगाव येथे जाहीर सभा होणार असून विमानतळ शेजारीच असलेल्या पटांगणावर या सभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलासह सर्व गुप्तचर यंत्रणा शहरात दाखल झाल्या आहे. त्यांच्या निगराणीखाली सभेची तयारी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

जळगाव : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी (ता. 13) जळगाव येथे जाहीर सभा होणार असून विमानतळ शेजारीच असलेल्या पटांगणावर या सभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलासह सर्व गुप्तचर यंत्रणा शहरात दाखल झाल्या आहे. त्यांच्या निगराणीखाली सभेची तयारी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. पक्षातील नेते मंडळींसह राष्ट्रीय सुरक्षा दल, पोलिस दलासह विविध सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून सभेची जय्यत तयारी केली जात आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलाकडून गेल्या काही दिवसांपूर्वीच सभा स्थळाची पाहणी केली होती. त्यानुसार त्यांच्या निगराणीखाली चोवीस तास व्हीडीओ कॅमेऱ्यासह संपूर्ण सुरक्षा यंत्रणेच्या निगराणीखाली सभेची तयारी केली जात आहे. त्यामुळे सभेच्या पूर्वीच सभा स्थळाला छावणीचे रूप प्राप्त झाले आहे. 

मजुरांना दिल्या पासेस 
शहरात पंतप्रधानांची सभा होत असल्याने या सभा स्थळाचा ताबा स्थानिक पोलिसांसह राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी घेतलेला आहे. सभेची तयारी करण्यासाठी सभेच्या स्थळी पोलिसांचा चोवीस तास पोलिसांचा पहारा असून त्याठिकाणी काम करणाऱ्यांची संपूर्ण तपासणी केली जात आहे. तसेच प्रत्येक मजुराला ओळखपत्र दिले असून ओळखपत्र असलेल्यांनाच सभेच्यास्थळी जाण्यासाठी परवानगी दिली जात आहे. 

पोलिस बंदोबस्ताची तयारी 
सभेचे ठिकाण निश्‍चित झाल्यापासून सभास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणासह राष्ट्रीय सुरक्षा दलाचा कडेकोट बंदोबस्त 
आहे. राष्ट्रीय सुरक्षा दल, एसआयडी, नाशिक परिक्षेत्रातील कमांडोंसह राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यातील पोलिसांचा बंदोबस्त सभेस्थळी राहणार असून यामध्ये जिल्हाभरातील 20 पोलिस निरीक्षक, 61 पोलिस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तसेच 1 हजार 180 पुरुष, तर 173 महिला पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक सभेच्या स्थळी बंदोबस्तासाठी करण्यात आली आहे. शेजारील जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news natinal security modi sabha