नाट्य परिषदेचे नाशिक शाखेचे प्रशांत दळवी, मोहन जोशी, हेमंत टकले यांना पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

 

 

नाशिकः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे देण्यात येणारा वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार प्रसिद्ध नाट्यलेखक प्रशांत दळवी यांना, प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार ज्येष्ठ नाट्यकर्मी हेमंत टकले यांना जाहीर झाला आहे. अकरा हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मे महिन्यात या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 

Web Title: marathi news natya parishad award

फोटो गॅलरी