esakal | मधमाशांनी रोखला अंत्यविधी...शेवटी बोलाविले जेसीबी
sakal

बोलून बातमी शोधा

bee attack

मोठे कडवान येथील लक्ष्मीबाई सखाराम वळवी (वय ५९) यांचे निधन झाले होते. काल (ता.२४) दुपारी बाराच्या सुमारास ग्रामस्थ स्मशानभूमीत आले असता तेथील मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यापासून बचावासाठी ग्रामस्थांनी मृतदेह प्रेत जागेवर ठेवत सैरावैरा पळ काढला. मधमाशांनी गावापर्यंत लोकांचा पाठलाग करून त्यांना जखमी केले.

मधमाशांनी रोखला अंत्यविधी...शेवटी बोलाविले जेसीबी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवापूर : मोठे कडवान (ता. नवापूर) येथे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेलेल्या लोकांवर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास शंभरावर लोक जखमी झाले. या मधमाशांनी ग्रामस्थांचा थेट गावापर्यत पाठलाग केला, दरम्यान दफनविधी जेसीबीच्या मदतीने कसाबसा उरकण्यात आला. 

नक्‍की वाचा - देवा काय पाप केले रे माझ्या काळजाच्या तुकड्यांनी...आईचा आक्रोशाने हजारोंच्या डोळ्यात पाणी 

मोठे कडवान येथील लक्ष्मीबाई सखाराम वळवी (वय ५९) यांचे निधन झाले होते. काल (ता.२४) दुपारी बाराच्या सुमारास ग्रामस्थ स्मशानभूमीत आले असता तेथील मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यापासून बचावासाठी ग्रामस्थांनी मृतदेह प्रेत जागेवर ठेवत सैरावैरा पळ काढला. मधमाशांनी गावापर्यंत लोकांचा पाठलाग करून त्यांना जखमी केले. मधमाशांचे हे रौद्ररूप आणि आक्रमकता पाहून सर्वच घाबरले. यात काही महिलांही दुखापतग्रस्त झाल्या. सरपंच बंधू पाच्‍या वळवी यांनी १०८ या रुग्णवाहिकेला बोलवत जखमींना खांडबारा व नवापूर येथील विसरवाडी, खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या काळात काहींनी वैयक्तिक वाहनाद्वारे जखमींना शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल केले. मधमाशांच्या पोळ्याला कुणीतरी धक्का लागल्याने मधमाशा चवताळल्याचा अंदाज आहे. 
 
जेसीबीने केला दफनविधी 
मधमाशांच्या हल्ल्यानंतर सारेच जीव घेत पळत सुटल्याने लक्ष्मीबाई वळवी यांचा मृतदेह दुपारी बारापासून स्मशानभूमीतच पडून होता. काही ग्रामस्थांनी दफनविधीसाठी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मधमाशा लोकांना जवळपासही फिरकू देत नव्हत्या. दफनविधीच्या प्रयत्नात दुपारचे तीन वाजले. दफनविधी करणे आवश्यक होतं म्हणून सरपंच बंधू वळवी यांनी खांडबारा येथून जेसीबी मागवून घेतला. अखेर त्याच्या मदतीने दफन करण्यात आले. 
 

loading image
go to top