थरारक...३५ फूट खोल नदीत कार कोसळली अन्‌

विनायक सुर्यवंशी
Friday, 7 August 2020

जामनेरहून (जि. जळगाव) गुजरातमधील बडोदा येथे दोघे कार (एमएच १९, सीव्ही १९१०) ने जात होते. शुकवारी सायंकाळी रायगंण नदीच्या पुलावर असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ३५ फूट खोल नदीपात्रात पडली.

नवापूर : नागपूर- सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर शहरापासून पाच किलोमीटरवर असलेल्या रायंगण नदीच्या पुलावरून ३५ फूट खोल असलेल्या नदीपात्रात कार कोसळल्याने दोन जण जखमी झाले. पैकी एकाची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुकवारी (ता. ७) सायंकाळी पाचला हा अपघात घडला. 
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामनेरहून (जि. जळगाव) गुजरातमधील बडोदा येथे दोघे कार (एमएच १९, सीव्ही १९१०) ने जात होते. शुकवारी सायंकाळी रायगंण नदीच्या पुलावर असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ३५ फूट खोल नदीपात्रात पडली. कारमध्ये चालक शुभम राजेश पटेल (वय २४, रा. बडोदा, गुजरात) व विपुल गोपाल पटेल (२८, रा. भटाईनगर, जामनेर, जि. जळगाव) अशा दोनच व्यक्ती होत्या. त्यात चालक शुभम पटेल गंभीर जखमी झाला. 

पाणी असल्‍याने बचावले
नदीपात्रात पाणी असल्याने कार खडकावर आदळून त्याची तीव्रता कमी झाली. कार नदीपात्रात पडल्याचा आवाज एकून जवळ असलेल्या स्थानिक नागरिकांनी नदीत घेऊन दोघांना कारमधून बाहेर काढले व १०८ रुग्णवाहिकेस पाचारण केले. रुग्णवाहिकाचालक लाजरस गावित यांनी तातडीने त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

संपादन : राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur briage 35 foot river car out control and Collapsed