उच्छलमार्गे नवापुरातही कोरोनाने केला शिरकाव 

corona posi
corona posi

नवापूर : अखेर नवापूर शहरातही कोरोनाने शिरकाव केलाच. नवापूर रेल्वेस्थानक परिसरातील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आजपर्यत न पोचलेला कोरोना आल्याने जनता भयभीत झाली आहे, ती या महिलेच्या पतीचे हॉटेल नवापुर हद्दीत आहे आणि त्याचा संपर्क यामुळे. 


ही महिला फक्त नावाला उच्छल (जि. तापी, गुजरात) मधील हनुमान फळीमध्ये राहते. मात्र हा परिसर पूर्णपणे महाराष्ट्र हद्दीला लागून आहे. रेल्वे स्टेशन परिसरात सर्व एकत्र वसाहत आहे. या लोकांचा सर्व व्यवहारही नवापूर शहराशी आहे. 

परिसर सील करणे सुरू 
नवापूर प्रशासनाने घटनेची माहिती मिळताच रेल्वेस्थानक परिसर, नवापूर जुना सीमा तपासणी नाका, नेहरू उद्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय विश्रामगृह हा परिसर सील करण्याचे काम सुरू केल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली. संबंधित परिवाराशी किती जण संपर्कात आले त्यावरुन उद्या नवापूर शहरात कोणता परिसर सील करायचा तेही ठरविण्यात येईल. 
या महिलेच्या परिवाराची हॉटेल रेल्वे स्टेशन परिसरात असल्याने अनेक जण संपर्कात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही २४ वर्षीय महिला गोमतीपुर (अहमदाबाद) येथून १८ मेला नवापूर येथे सासरी आली होती.२२ ला लक्षणं दिसल्याने स्वॅब तपासणीला पाठवला होता. उच्छल प्रशासनाने या महिलेला होमक्वारोंटाइन केले होते, तिचा स्वाब घेतला होता. आज दुपारून अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पाचच्या सुमारास उच्छल प्रशासन तिला घेऊन गेले. 

महिलेच्या पतीचे हॉटेल 
ही बाब शहरात वाऱ्यासारखी पसरताच सन्नाटा पसरला. या महिलेला बाळ झाल्याने त्यांच्या घरी भजन कीर्तनचा कार्यक्रम झाल्याची चर्चा आहे. या महिलेच्या पतीचे हॉटल आहे, त्यामुळे त्यांच्या संपर्कात किती जण आले हे सांगणे कठीण आहे. त्यांच्या परिवारातील एक हॉटेल नवापूर येथे पेट्रोल पंपाजवळ आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहक असतात. या सर्वांचा संपर्क नवापूर शहर व तालुक्यात येतो. 

वाकिपाडाही करावे सील 
क्वारंटाईन केलेल्या घरात भजन कीर्तन करणे कितपत उचित आहे. लोकांना अजूनही कोरोनाचे गांभिर्य नाही. जेमतेम कालपासून सर्व व्यवहार सुरू झालेले असताना आजच्या घटनेने जनता पुन्हा सुन्न झाली आहे. हनुमान फळी व वाकीपाडा या गावांचा एकमेकांशी संपर्क असल्याने वाकीपाड देखील सील करण्याची मागणी वाकीपाडा येथील ग्रामस्थ करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com