बनावट कागदपत्रांच्या आधारे काढले 29 लाख!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

नवापूर : तहसीलदारांकडून कोणतीही मागणी नसताना, त्याबाबतची बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय खात्यातून 29 लाख रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग करण्यात आले. येथील कोशागार कार्यालयातील लिपिकाने हा प्रकार केला. विशेष म्हणजे त्याने बॅंक खात्यातून 25 लाख रुपये काढले असून, तो पळून गेला होता. आज सायंकाळी त्याला ताब्यात घेण्यात आले. 
याबाबत माहिती अशी : राज्याच्या विविध विभागांचा, शासकीय खर्चाचा निधी जिल्हा कोशागार कार्यालयात येत असतो. तेथून संबंधित विभागप्रमुखांच्या शासकीय खात्यात जमा करण्यात येतो. त्यासाठी संबंधित विभागाकडून कोशागार कार्यालयात आवश्‍यक देयके दिली जातात. 

येथील कोशागार कार्यालयातील लिपिक इंदल महारू जाधव (मूळ रा. भाटपुरा, ता. शिरपूर, नंदुरबार) याच्याकडे शासकीय कार्यालयातील देयकांचे काम आहे. त्याने तहसील कार्यालयाकडून कोणत्याही रकमेची मागणी केली नसताना, त्याने बनावट कागदपत्रे तयार केली. उपकोशागाराच्या "संगणकीय सबट्रेझरी नेट' या आज्ञावलीमध्ये 29 लाखांचे टोकन क्रमांक 317 व 318 अशी दोन खोटी देयके तयार केली. ऑनलाइन पद्धत वापरून पारीत केले. मुद्रित बॅंक सूचनापत्रातील तहसीलदार व खाते क्रमांकावर खाडाखोड केली. उपकोशागार अधिकारी साळी यांच्या बनावट सह्या केल्या. बॅंक सूचनापत्र बॅंकेत दिले. शासकीय तिजोरीतील रक्कम स्वतःच्या बॅंक खात्यात जमा करून घेतली. ती खात्यात जमा झाल्यानंतर एटीएम आणि बॅंकेतून 25 लाख 80 हजार रुपये काढून घेतले. 
स्टेट बॅंकेच्या येथील शाखेतील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बॅंक सूचनापत्रावर (बॅंक ऍडव्हाइस) व नवापूर येथील उपकोशागारांच्या स्वाक्षरीची पडताळणी न करता, निष्काळजीपणे व्हाउचर नसताना जाधवच्या खात्यात 29 लाख रुपये जमा केले. ही रक्कम आपल्या खात्यात जमा होताच जाधवने 8 ते 12 जूनदरम्यान आपल्या खात्यातून एटीएम आणि विड्रॉवल स्लीपव्दारे 25 लाख 80 हजार रुपये काढले. तो पैसे घेऊन पळून गेला होता. आज सायंकाळी त्याला ताब्यात घेतले. याबाबत पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी तपास करत आहेत. 
 
कुंपणाने शेत खाल्ले...! 
1980 च्या दशकात धुळे जिल्हा परिषदेत भास्कर वाघ याने धनादेशावर आकडे बदलले होते. त्यातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला. आता ऑनलाइन व्यवहार होतात. त्यातही मोठ्या रकमेचा गैरव्यवहार झाला. कोशागार कार्यालय, स्टेट बॅंक आणि तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीच्या कागदपत्रांचा समावेश आहे. यातून ज्यावर सामान्यांचा विश्‍वास आहे, अशा यंत्रणांचा वापर करण्यात आला आहे. "कुंपणाने शेत खाल्ल्या'सारखा हा प्रकार आहे. 

Web Title: marathi news navapur duplicate documant 29 lakh