esakal | जंगलात उभी होती आयशर; पथकाच्या तपासणीत आले सत्‍य बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

navapur forest aria eicher

नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना मिळालेल्या माहितीवरून आज सकाळी दहाला वन विभागाच्या पथकाने वावडी (सावरट, ता. नवापूर) येथे गावात तपकिरी रंगांची आयशर (क्र. एमएच १९ झेड. ३७५३) गाडी उभी होती.

जंगलात उभी होती आयशर; पथकाच्या तपासणीत आले सत्‍य बाहेर

sakal_logo
By
विनायक सुर्यवंशी

नवापूर (नंदुरबार) : सावरटचा वावडीपाडा (ता. नवापूर) येथे संशयीतरित्या उभी असलेली तपकिरी रंगाच्या आयशर वाहनाची वन विभागाच्या पथकाने तपासणी केली. वाहनात खैर व शिसम लाकडाचे चौपाट भरलेला आढळून आला. दरम्यान घटनास्थळावरून वाहन चालक फरार झाला. अवैध लाकुड मालासह वाहन जप्त करून वन विभागाच्या आगारात जमा केले. तेरा लाखाचा मुद्देमाल पकडण्यात आला. 

नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना मिळालेल्या माहितीवरून आज सकाळी दहाला वन विभागाच्या पथकाने वावडी (सावरट, ता. नवापूर) येथे गावात तपकिरी रंगांची आयशर (क्र. एमएच १९ झेड. ३७५३) गाडी उभी होती. गाडी उभी असल्‍याचा संशय आल्‍याने तपासणी केली. वाहनात ताज्या तोडीचा खैर साल काढलेला व शिसम चौपाट भरलेला लाकडाचा साठा आढळून आला. दरम्यान घटनास्थळावरून वाहन चालक फरार झाला. 

तेरा लाखाचा माल
सदर प्राप्त लाकुड माल अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे समजल्यानंतर लाकुड मालासह वाहन जप्त करून नवापूर शासकीय विक्री आगारात वनपाल यांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत नवापूर वनक्षेत्रपाल यांनी गुन्हा नोंद केला. सदर कारवाई वनक्षेत्रपाल खांडबारा व रेंज स्टाफ खांडबारा, वनक्षेत्रपाल फिरते पथक शहादा व स्टाफतसेच रेंज स्टाफ नवापूर यांनी केली. सदर जप्त लाकुड माल व वाहनाची अंदाजे किंमत १३ लाख असुन पुढील कारवाई वनसंरक्षक धुळे, वनवृत्त धुळे, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा, विभागीय दक्षता अधिकारी धुळे, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रशांत हुमने, वनपाल पवार खांडबारा, डी. के. जाधव, वनरक्षक संजय बडगुजर, प्रशात सोनवणे, कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, सतिष पदमोर, नितिन पाटील, लक्ष्मन पवार,किसन वसावे,दक्षता पथक शहादा व रेंज स्टाफ नवापूर पुढील तपास करीत आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे