st bus
st bus

साडे आठ हजारावर मजुरांना प्रशासनाने केले पोच 

नवापूर : गुजरात राज्यातून येणाऱ्या बहुसंख्य मजुरांना महाराष्ट्राच्या सीमेवर सोडले जात आहे. तेथून त्यांच्या गावाकडे रवाना करण्यासाठी नवापूर येथील प्रशासन व स्वयंसेवी संस्था सर्वोत्तपरीने मदत करीत आहेत.आतापर्यंत ३८९ एस.टी बसद्वारे आठवड्याभरात साडे हजारावर मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोचविण्यात आले आहे. 
कोरोनाच्या कहरने सारेच भयभीत झाले आहेत. रोजगारासाठी नजीकच्या गुजरात राज्यात हजारो मजूर स्थलांतरित झाले आहेत. त्यांचे स्थलांतर हे दरवर्षीचे आहे. मात्र अचानक यावर्षी कोरोनाचा संसर्गातून महामारी पसरली. त्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. या महामारीपासून नागरिकांना वाचविण्यासाठी शासन -प्रशासन विविध उपाययोजना राबवीत आहे. लाखो रूपये खर्च करून नागरिकांना जेवण, निवास, आरोग्य या सुविधा पुरवीत स्थलांतरित मजुरांना आपआपल्या गावी परत आणण्यासाठी बस, रेल्वेची व्यवस्था करून त्यांचा गावापर्यंत पोचविण्यात येत आहे. गुजरात राज्यातून महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील हजारो मजुरांचा लोंढा नवापूरच्या सीमेवर येऊ लागला आहे. तेथून महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने प्रशासन या मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोच करीत आहेत. त्यासाठी दोन महिन्यापासून आगाराचा आवारात धूळ खात पडलेली लालपरी सज्ज झाली आहे. 
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने उद्योग क्षेत्र द पडले आहेत. कामधंदे बंद पडले, मजूर वर्ग आपापल्या गावी परत जाण्यासाठी निघाले. चौथ्यांदा लॉकडाऊन वाढविण्यात आले.या दरम्यान खऱ्या अर्थाने होरपळला गेला तो म्हणजे कामगार वर्ग.परराज्यात अडकलेले कामगार मिळेल त्या मार्गाने आपले गाव, घर गाठण्याचा प्रयत्न करीत आहे. 
नवापूर गुजरात -महाराष्ट्र सीमेवर असल्याने येथे येणारे कामगार सीमा तपासणी नाक्यावर गर्दी करीत आहेत.बहुसंख्य मजूर हे पायी येत आहेत. त्यांना गावा पर्यन्त सोडण्याचे काम महसूल विभाग ,पोलीस प्रशासन तसेच नवापूरात कार्यरत स्वयंसेवी संस्था मजुरांचा मदतीला धावून आले आहेत. आठवड्यात ३८९ बस रवाना झाल्या आहेत. आज आरटीओ सीमा तपासणी नाका बेडकी येथे शेकडोच्या संख्येने मजूर काही वाहनाने तर काही पायी चालत आले. सर्वांना तहसीलदार उल्हास देवरे , गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, आगार प्रमुख राजेंद्र आहिरे, ज्ञानेश्वर पवार यांनी बसने रवाना केले. 

आज पावेतो ३१२ बस 
बिजासन घाट, सटाणा एक, नांदेड एक, अमरावती ३, गोंदिया ५७, खामगाव एक, वाशिम एक , अकोला ३, चंद्रपूर १, औरंगाबाद, यवतमाळ, नागपूर३, भंडारा दोन, वर्धा, गडचिरोली एक अशा एकूण ३८९ बस नवापूर आगारातून सोडण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com