नवापूर सिमेवर वाहन तपासणी करतांना लागल्या रांगा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

दोन दिवसापासून नवापूर सीमा तपासणी नाक्यावर ताटकळत होते,  सीमा तपासणी नाक्या जवळ कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने खाण्यापिण्याची गैरसोय झाली.  हॉटेल्स बंद असल्याने वाहनचालकांचे मोठे हाल झाले आहेत.

नवापूर : येथील सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्राने गुजरात राज्य सील केले. दोन दिवसापासून राज्य सीमा बंदीमुळे नवापूर सीमा तपासणी नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बाराशेच्या जवळपास अवजड वाहन, ट्रक दोन्ही बाजूंनी उभ्या होत्या. वाहनांवरील अडीच हजार चालक व सहचालक यांची खाण्या पिण्यापासून गैरसोय झाली आहे. या वाहनांपैकी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक करणाऱ्या वाहनांना सोडण्यात आले. 

देशातील विविध राज्यातून आलेले ट्रक चालक कोणात्याही प्रकाराची काळजी न घेता समूहाने राहत असल्याने कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने ट्रक चालकांना मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन अजूनही परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत नाही असेच चित्र आहे. सर्व चालढकल प्रकार सुरू आहे, महसूल परिवहन विभागाकडे बोट दाखवून आपल्या जबाबदारी पासून दूर होत आहे. ही बाब सर्वांसाठी घातक ठरू शकते. प्रत्येक ट्रकमध्ये चालक, सहचालक असे अडीच हजार  लोकांचा समूह होता. दोन दिवसापासून नवापूर सीमा तपासणी नाक्यावर ताटकळत होते,  सीमा तपासणी नाक्या जवळ कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने खाण्यापिण्याची गैरसोय झाली.  हॉटेल्स बंद असल्याने वाहनचालकांचे मोठे हाल झाले आहेत. परिवहन विभागाने कुठेही सोय न केल्याने ट्रक चालकांनी नाराजी व्यक्त केली. सदभाव कंपनीने शंभर ट्रक चालकांना जेवन दिले असले तरी अर्धे ट्रक चालक उपाशी राहिले. नवापूर ट्रक चालक मालक संघटनेने चारशे ट्रक चालकांना जेवन दिले.

देशातील विविध राज्यातून आलेले ट्रक चालक कोणात्याही प्रकाराची काळजी न घेता समूहाने राहत असल्याने कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने ट्रक चालकांना मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील प्रशासनाचा हलगर्जीपणा नवापूर शहराला घातक ठरू शकतो. सीमा तपासणी नाक्यावरील ट्रक चालकांची गर्दी नवापूर शहरवासीयांना धोक्याची घंटी आहे. सिमा तपासणी नाक्यावरील गर्दी कमी व्हावी या दृष्टिकोनातून उपाय योजना करणे गरजेचे आहे.

दोन दिवसांपासून नवापूर सीमा तपासणी नाक्यावर अडीच हजार लोक ताटकळत होते. खाण्यापिण्याचे वांदे, पुरेसे स्वच्छतागृह नसल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. हॉटेल्स बंद असल्याने वाहनचालकांचे मोठे हाल झाले होते,  परिवहन विभागाने कुठेही सोयन केल्याने ट्रक चालकांनी नाराजी व्यक्त केली. परिवहन विभागाचे अधिकारी ट्रक चालकांना कुठल्याही प्रकारचा सुचना देतांना दिसून आले नाही. गुजरात पोलिस वाहन चालकांना मास्क लावण्याची सुचना करत असल्याचे दिसून आले तर महाराष्ट्र पोलिसांनी नाक्यावर पिण्याचे पाणी अशी सुविधा केली होती. 

महाराष्ट्र- गुजरात सीमावर्ती भागात असलेले आरोग्य विभागाची टिमकडे कुठलेही कोरोना आजाराची लागण झाली याची तपासणी करण्यासाठी मशीन उपलब्ध नाही,  संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती भागात मशीन देण्यात आले आहे. नवापूरला उपलब्ध झालेले नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nawapur Vehicles were inspected at Navapur border