राष्ट्रवादीचा दहा मार्चला हल्लाबोल मोर्चाचा समारोप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 मार्च 2018

नाशिक : शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न, वाढती महागाई आदी मुद्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने उत्तर महाराष्ट्रात काढलेल्या विविध मोर्चांचा समारोप येत्या दहा मार्चला होणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितित गोल्फ क्‍लब मैदानावर विराट सभा होणार असल्याचे विधी मंडळ गटनेते, आमदार जयतं पाटील यांनी सांगितले. 

नाशिक : शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न, वाढती महागाई आदी मुद्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने उत्तर महाराष्ट्रात काढलेल्या विविध मोर्चांचा समारोप येत्या दहा मार्चला होणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितित गोल्फ क्‍लब मैदानावर विराट सभा होणार असल्याचे विधी मंडळ गटनेते, आमदार जयतं पाटील यांनी सांगितले. 

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकायांच्या बैठक व मोर्चा समारोप तयारीचा आढावा आमदार पाटील यांनी घेतला त्यानंतर ते बोलत होते. हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून लोकांमध्ये सरकार विरोधातील नाराजीचा सुर दिसून आला. कर्जमाफीतील गोंधळ, बोंडअळीच्या मुद्यावरून शेतकयांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली, उत्पादीत मालाला आधारभुत किंमत नाही, इंधन दरवाढ, महागाईच्या मुद्यावर सरकार विरोधात लोकांमध्ये रोष असल्याचे मोर्चातून दिसले. लोकांमधील नाराजीला हल्लाबोल मोर्चातून तोंड फुटले आहे.

येत्या दहा तारखेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधी मंडळ नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित राहणार आहे. यावेळी आमदार जयवंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पगार, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार दिलीप बनकर, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, विजयश्री चुंबळे, प्रेरणा बलकवडे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार आदी उपस्थित होते. दरम्यान श्री. पाटील यांनी हल्लाबोल मोर्चाच्या समारोप होणाऱ्या गोल्फ क्‍लब मैदानाची पाहणी केली. 

तर चक्का जाम आंदोलन 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहरी व ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या नाराजीला तोंड फोडले जात आहे. नागरिकांच्या प्रश्‍नावर आंदोलन करताना संघटनात्मक पातळीवर देखील पक्षाकडून बांधणी सुरु असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. शहरात मालमत्ता करवाढीच्या प्रश्‍नावरून सहा विभागात आंदोलन सुरु आहे. करवाढ मागे घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले असले तरी जोपर्यंत ती करवाढ मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुचं राहणार आहे. अगदी चक्का व काम बंद आंदोलनाची तयारी करण्यात आल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: marathi news ncp meeting