पात्र उमेदवारांसाठी गुड न्युज....नव्या वर्षात सेटच्या अर्ज प्रक्रीयेची सुरवात

residentional photo
residentional photo

नाशिक : महाराष्ट्र तसेच गोवा राज्यात सहायक प्राध्यापक होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या महाराष्ट्र स्टेट इलिजिब्लीटी टेस्ट (सेट) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार इच्छुक पात्र उमेदवारांना परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी 1 जानेवारी 2020 पासून ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. 21 जानेवारीपर्यंत अर्जाची अंतीम मुदत आहे. तर 28 जूनला सेट परीक्षा घेतली जाईल. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत सेट परीक्षेचे संयोजन केले जात असते. 36 व्या एमएच-सेट परीक्षेचे दिशानिर्देश जारी केले आहे. या परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरणे आवश्‍यक आहे. मात्र भरलेल्या अर्जाची प्रत विद्यापीठ किंवा अन्य कुठल्याही पत्त्यावर पाठविण्याची आवश्‍यकता नाही. सद्य:स्थितीत 32 विविध विषयांकरीता सेट परीक्षा घेतली जात असते.

विविध शहरात परिक्षा

नाशिकसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नगर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली तर गोव्यातील पणजी अशा विविध पंधरा शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. यासंदर्भात जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जानेवारी 2020 पासून सुरु होणार आहे. 21 जानेवारीपर्यंत अर्ज भरायची संधी असून, त्यानंतर अर्ज दुरूस्तीची मुदत 29 जानेवारीपर्यंत असेल. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी आठशे रूपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना साडे सहाशे रूपये शुल्क भरावे लागणार आहे. 


तीनशे गुणांसाठी असतील दोन पेपर 
सेट परीक्षेत वस्तूनिष्ठ स्वरूपातील प्रश्‍न विचारले जाणार असून एकूण तीनशे गुणांसाठी दोन पेपर घेतले जातील. 28 जून 2020 ला होणाऱ्या या परीक्षेत सकाळी दहा ते अकरा दरम्यान पेपर क्रमांक एक पार पडेल. या पेपरमध्ये प्रत्येकी दोन गुणांसाठी पन्नास प्रश्‍न सोडवायचे असतील. विशेष विषयावर आधारीत असलेला पेपर क्रमांक दोनमध्ये शंभर प्रश्‍न विचारले जातील. पेपर क्रमांक दोन सकाळी साडे अकरा ते दुपारी दीडदरम्यान होईल. पेपरचे अ, ब, क, ड असे चार संच असतील. 

म्हणून परीक्षेच्या तारखेत केला बदल 
विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत ऑनलाईन स्वरूपात (सीबीटी) युजीसी-नेट परीक्षा घेतली जाणार असून, ही परीक्षा 20 जून 2020 ला संपते आहे. सेट परीक्षेच्या यापूर्वी जाहीर वेळात्रकानुसार 21 जूनला घेतली जाणार होती. मात्र विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षेच्या तारखेत बदल करत 28 जून निश्‍चित केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com