निफाडचा पारा 4.8 अंशांवर, द्राक्षपंढरी गारठली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

निफाड : या हंगामातले हे सर्वात कमी 4.8 अंश सेल्सिअस किमान तपमानाची नोंद कुंदेवाडी येथे झाली असून आज कृषी संशोधन केंद्रातील गहू पिकांवर मोठ्या प्रमाणात दविबंदू जमा झाल्याचे दिसत होते. तर या थंडीने हरभरा व गव्हाच्या पिकाला या थंडीचा फायदा होणार आहे. थंडीचा तडाखा अजून जर वाढला तर नुकतीच फुगवण आलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची भीती द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केली आहे. यामुळे द्राक्षांना मागणी घटते व आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावू लागणार असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर मागील वर्षी 12 जानेवारी 2017 रोजी 4 अंश सेल्सिअस किमान तपमानाची नोंद झाली होती.

निफाड : या हंगामातले हे सर्वात कमी 4.8 अंश सेल्सिअस किमान तपमानाची नोंद कुंदेवाडी येथे झाली असून आज कृषी संशोधन केंद्रातील गहू पिकांवर मोठ्या प्रमाणात दविबंदू जमा झाल्याचे दिसत होते. तर या थंडीने हरभरा व गव्हाच्या पिकाला या थंडीचा फायदा होणार आहे. थंडीचा तडाखा अजून जर वाढला तर नुकतीच फुगवण आलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची भीती द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केली आहे. यामुळे द्राक्षांना मागणी घटते व आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावू लागणार असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर मागील वर्षी 12 जानेवारी 2017 रोजी 4 अंश सेल्सिअस किमान तपमानाची नोंद झाली होती. त्यामुळे तालुक्याच्या द्राक्षपंढरीला हुडहुडी भरली होती.

दरम्यान  बदलते वातावरण आणि कोसळता पारा यामुळे तालुक्यातील 22 हाजार हेक्टरवरील द्राक्षशेती संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाल्याने बागा थंडीच्या कहरापासुन वाचविण्यासाठी द्राक्षउत्पादक शेतकरी विविध उपाययोजना करत आसल्याचे चित्र आहे. निफाड तालुक्यात सर्वाधिक द्राक्षबागा आहेत. या बागांना गेल्या काही वर्षात वातावरणातील बदलाचा सामना करावा लागत आहे. घटत्या तापमानामुळे आवघी द्राक्षपंढरीला थंडीचा परीणाम जाणवत आहे. द्राक्षघडांची वाढ खुंटण्या बरोबरच मुळे चकोप होणे साखर उतरण्याची प्रक्रीया थांबणे द्राक्षांना तडे जाण्याची शक्यत निर्माण झाल्याने शेतकरी बागांतील वातावरण सारखे राहण्यासाठी बागेत शेकोट्या पेटवून उष्णता निर्माण करत आहे. तर ड्रीपद्वारे बागांना पाणी देत द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. असे असले तरी भारनियमनामुळे पहाटे बागांना पाणि देता येत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. वाढत्या थंडीमुळे द्राक्षबागांच्या चिंता वाढणार असल्यातरी गहु कांदा पिकासाठी हे वातावरण लाभ दायक आहे. 

Web Title: Marathi news nifad news winter season