
भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी दहाला बसस्थानक, खुडाणे चौफुली व मेन रोडवरील आझाद चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह विजयी घोषणा दिल्या
निजामपूर : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत धुळे-नंदुरबार मतदारसंघातून माजी शालेय शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल यांचा दणदणीत विजय झाल्याचे समजताच माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणेत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी दहाला बसस्थानक, खुडाणे चौफुली व मेन रोडवरील आझाद चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह विजयी घोषणा दिल्या.
वाचा- पन्नाशीपार पुंडलिक भामरे यांची तरुणाईला लाजविणारी ऊर्जा
भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजितचंद्र शाह, दशरथ शेलार, पंचायत समिती सदस्य सतीश वाणी, तालुका उपाध्यक्ष मगन जाधव, निजामपूर शहराध्यक्ष महेंद्र वाणी, सरचिटणीस श्याम शाह, अभिजित भावसार, सुधाकर माळी, सुनील भावसार, किरण महाजन, केवबा बच्छाव, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सरपंच अजितचंद्र शाह व शहराध्यक्ष महेंद्र वाणी यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, विलास बिरारीस, सचिन दहिते, उत्पल नांद्रे, म्हसाई ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदुलाल जाधव व उद्योजक ललित आरुजा यांनी धुळे येथील एसव्हीकेएम अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार अमरिशभाई पटेल यांचा सत्कार केला. भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. शरदचंद्र शाह, सुरेश पाटील, ॲड. संभाजी पगारे, हर्षवर्धन दहिते, लीला सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रा. सविता पगारे, पिंपळनेर मंडलाध्यक्ष मोहन सूर्यवंशी, साक्री मंडलाध्यक्ष वेडू सोनवणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, संजय खैरनार, तालुका उपाध्यक्ष वासुदेव बदामे, ईश्वर न्याहळदे, नवल खैरनार, प्रदीप नांद्रे, मोहन ब्राह्मणे, मुकेश पाटील, कन्हय्यालाल काळे आदींनी श्री. पटेल यांचे अभिनंदन केले.