महापूरामुळे चांदोरी,सायखेडा गावांचा संपर्क तुटला

माणिक देसाई,सागर आहेर,संजय भागवत
रविवार, 4 ऑगस्ट 2019

निफाड- गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी दारणा कादवा बानगंगा या नद्यांना महापूर आल्याने निफाड तालुक्यातील स्थान चांदोरी सायखेडा या गावांचा संपर्क तुटला आहे तर चांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सायखेडा येथील मुख्य रस्ता शिंगवे रस्ता बस स्थानक परिसर पाण्याखाली गेले आहे

 निफाड तालुक्यातील नांदूर-मधमेश्वर धरणातून पूर परिस्थितीमुळे 83 773 इतका पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणाच्या दिशेने सुरू आहे तर धरणाखालील नांदूर मधमेश्वर जवळील स्मशानभूमी तसेच निफाड सिन्नर रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने निफाड सिन्नर चा संपर्क तुटला आहे सध्या होत असलेल्या पावसामुळे मी परत आली त्यातील बहुतेक नदी-नाले वाहू लागल्याने पुराच्या पाण्यात प्रचंड वाढ होत आहे त्यामुळे निफाड करांमध्ये पावसामुळे धडकी भरल्याचे सध्यातरी चित्र आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news niphad saykhada