महापालिका आयुक्त तुकाराम  मुंढेच्या बदलीची शहरभर चर्चा

residentional photo
residentional photo

नाशिक : कर्तव्यदक्ष,कारवाईप्रिय अशी प्रतिमा असलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याची शहरभर दिवसभर चर्चा होती. त्याच्या जागी नाशिकलाच माजी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेले राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाल्याची चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे, कपाउंडीग पॉलीसी,घरपट्टी,पाणीपट्टी वाढ यासारख्या एक नव्हे अनेकबाबतीत मुंढेनी  घेतलेले निर्णय वादात राहिले. अगदी त्यावरून सत्तारूढ भाजपसह सर्वच नगरेसवकांनी कडाडून विरोध केल्याचे महापालिकेत पहायला मिळाले. मुंढे हे फ्रेबुवारी 2018 मध्ये रूजू झाल्यानंतर त्यानंतर अवघ्या अकरा महिन्याच्या कालावधीत त्याची बदली झाल्याची चर्चा रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com