नाशिक महापालिकेचे दांडीबहाद्दर नगरसेवक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

नाशिक ः महापालिका निवडणुकीपूर्वी नागरिकांना विकासकामांचे आश्‍वासन देत विरोधी पक्षांवर टीका करणाऱ्या उमेदवारांकडून निवडून आल्यानंतर मात्र विकासकामे मंजूर करून घेण्यासाठी प्रमुख व्यासपीठ असलेल्या महासभेत दांडी मारण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून दीड वर्षाच्या कालावधीत झालेल्या एकूण 25 महासभांना 433 नगरसेवकांनी दांडी मारल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. 

महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाल्यानंतर मार्चमध्ये महापौर- उपमहापौर पदाची निवडणूक झाली. या महासभांना निवडून आलेले सर्व नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर मे व जुलै 2018 मध्ये करवाढीच्या मुद्द्यावर झालेल्या महासभेलादेखील सर्वच नगरसेवकांनी हजेरी लावली होती. परंतु विकासकामे व अंदाजपत्रकीय महासभांना गैरहजर राहण्याचे नगरसेवकांचे प्रमाण अधिक असल्याचे नगरसचिव विभागाकडून माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

25 महासभांना गैरहजर नगरसेवकांची संख्या 433 एवढी असून, विद्यमान नगरसेवकांच्या एकूण संख्येच्या 311.62 टक्के एवढे प्रमाण आहे. 433 पैकी सहा नगरसेवकांचेच रजेचे अर्ज आतापर्यंत नगरसचिव विभागाला दिल्याचे सुनील ओसवाल यांना नगरसचिव विभागाने माहिती अधिकारातून कळविले आहे. एका महासभेचा शंभर रुपये भत्ता नगरसेवकांना मिळतो. सलग तीन महासभांना गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकावर अपात्र ठरविण्याची कारवाई करता येते. 

नगरसेवकांच्या हजर-गैरहजेरीचा लेखाजोखा 
- भाजपच्या सत्ता काळात 25 महासभा 
- पाच महासभा तहकूब 
- आठ महासभांना जादा विषय नाही 
- फेब्रुवारीतील महासभेत एक हजार 574 जादा विषयांचे प्रस्ताव 
- मार्च 2018 च्या महासभेत सर्वाधिक एक हजार 611 प्रस्ताव 
- एप्रिल 2018 च्या महासभेत सर्वांत कमी तीन प्रस्ताव 
- मे 2018 च्या महासभेत अवघे 42 नगरसेवक उपस्थित 
- जुलै 2018 मध्ये झालेली महासभा सर्वाधिक 12 तास चालली 
- जुलैमध्ये करवाढीच्या महासभेत 122 नगरसेवकांची हजेरी 

Web Title: marathi news nmc corportater