महासभेच्या अंदाजपत्रकाला कात्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

नाशिक- महापालिकेतील सत्तेला सव्वादोन वर्षांचा कालावधी उलटला तरी प्रभागातील विकासकामे होत नसल्यामुळे नाराज नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने सत्तारूढ भाजपात दुफळी माजली असताना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी देखील सत्ताधाऱ्यांना 'जोर का झटका' दिला आहे. पालिकेला उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांकडून मिळू शकणाऱ्या अपेक्षित उत्पनाचा अंदाज घेवूनच प्रारूप अंदापत्रकात विकासकामांसाठी तरतूद करण्यात आली होती.

नाशिक- महापालिकेतील सत्तेला सव्वादोन वर्षांचा कालावधी उलटला तरी प्रभागातील विकासकामे होत नसल्यामुळे नाराज नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने सत्तारूढ भाजपात दुफळी माजली असताना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी देखील सत्ताधाऱ्यांना 'जोर का झटका' दिला आहे. पालिकेला उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांकडून मिळू शकणाऱ्या अपेक्षित उत्पनाचा अंदाज घेवूनच प्रारूप अंदापत्रकात विकासकामांसाठी तरतूद करण्यात आली होती. मात्र स्थायी समितीनंतर महासभेनेही अंदाजपत्रकातील जमा बाजू फुगवत खर्च बाजूत धरलेली 353 कोटींची वाढीव कामे महापालिकेच्या उत्पन्नात अतिरीक्त वाढ झाल्याशिवाय अंमलात आणणे शक्‍य नसल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्पष्ट केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nmc mahasabha

टॅग्स