करवाढीचा महापालिकेच्या महसुलावर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

नाशिक : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी करवाढ करताना यापुर्वी दिलेल्या सवलती रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा काहीसा परिणाम पालिकेच्या महसुलावर दिसून येत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत घरपट्टी वसुलीत एक कोटी 2 लाख 94 हजार रुपयांची घट झाली आहे. 

नाशिक : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी करवाढ करताना यापुर्वी दिलेल्या सवलती रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा काहीसा परिणाम पालिकेच्या महसुलावर दिसून येत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत घरपट्टी वसुलीत एक कोटी 2 लाख 94 हजार रुपयांची घट झाली आहे. 
महसुल वाढ व ऑनलाईन करभरणा पध्दतीला प्रोत्साहन देण्यासाठी सन 2011 पासून नियमित कर अदा करणाऱ्या ग्राहकांसाठी सवलत योजना सुरु करण्यात आली होती. त्यानुसार आर्थिक वर्षाच्या सुरुवातील एप्रिलमध्ये कर अदा करणाऱ्यांना पाच टक्के, मे महिन्यात भरल्यास तीन तर जुन मध्ये कर अदा केल्यास दोन टक्के करसवलत देण्यात आली होती तर घरपट्टीसह पाणीपट्टी ऑनलाईन भरल्यास अतिरिक्त एक टक्का सुट देण्यात आली होती. योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतं होता. महापालिकेला सवलत योजनेतूनचं आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तीस ते चाळीस कोटी रुपयांचा महसुल मिळतं होता. पंरतू आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदरची योजना बंद करण्याची घोषणा केली त्यानुसार एक एप्रिल ते वीस एप्रिल पर्यंतच्या वीस दिवसातं घरपट्टीतून पालिकेला दोन कोटी 97 लाख 71 हजार 806 रुपये प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी पाच टक्के सवलतीतून चार कोटी 66 हजार 692 रुपये महसुल मिळाला होता. 
 
करवसुलीची विभागनिहाय तुलनात्मक स्थिती 
विभाग मागील वर्ष घरपट्टी वसुली 
सातपूर 43,88,111 33,24,334 
नाशिक पश्‍चिम 88,25,393 65,61,935 
नाशिक पूर्व 78,45,289 58,12,691 
पंचवटी 57,20,934 42,75,487 
सिडको 57,81,057 50,61,794 
नाशिकरोड 75,05,918 50,61,794 
 

Web Title: marathi news nmc tax increased