धारणकर मृत्यू प्रकरणी आयुक्तांच्या खुलाशावर  कर्मचारी आक्रमक; उद्या द्वारसभा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नाशिक ः कामाच्या ताणातून आत्महत्या केलेले महापालिकेचे घरपट्टी विभागातील सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांच्यावर कामाचा ताण नसल्याचा खुलासा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला. त्यावर म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेने जोरदार टीका केली आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करणे अपेक्षित असताना पोलिसांच्या चौकशीआधीच धारणकर यांनी लिहून ठेवलेली सुसाइड नोट खोटी ठरविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत यासह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (ता. 8) कार्यालयीन वेळ संपल्यानंतर राजीव गांधी भवन येथे द्वारसभा घेतली होणार आहे. 

संघटनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे म्हणाले, की कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त अपुरे मनुष्यबळ असूनही कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करत असल्याने अतिरिक्त कामातून मानसिक तणावात वाढ झाली आहे. यातूनच संजय धारणकर यांनी आत्महत्या केली. प्रशासनाने धारणकर यांच्यावर कामाचा ताणच नव्हता, ते महिनाभर रजेवर होते व रजेच्या काळातच ते अमरनाथ यात्रेला गेल्याचा खुलासा केला आहे. पण धारणकर तणावमुक्तीसाठीसुद्धा यात्रेला गेले असतील, असा उलट सवाल करत पोलिसांच्या चौकशीपूर्वीच धारणकर यांची सुसाइड नोट खोटी ठरविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जाणार असून, त्यासाठी द्वारसभा होणार आहे. 

प्रशासनाला घेरणार 
धारणकर यांच्या आत्महत्येसह महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले जाणार आहे. रिक्त पदे, नोकरभरती, सानुग्रह अनुदान, वैद्यकीय भत्ता, स्थानिक बेरोजगारांना कामात प्राधान्य, अनुकंपा तत्त्वावरील वारसांना नोकरी, गणवेश, सफाई कर्मचाऱ्यांना अपुरा साहित्य पुरवठा या प्रलंबित मागण्या प्रशासनाकडून सोडविल्या जात नसल्याने आंदोलन केले जाणार आहे. 
 
Web Title: marathi news nmc woker andolan