पाटगावपिंप्रीमध्ये स्मशानभूमीत नवरदेव परिधान करतात कपडे 

residentional photo
residentional photo

नाशिकः पाटगावपिंप्री (ता. सिन्नर) गावात अनोखी परंपरा जोपासली जातेय. गावात विवाह सोहळा होण्याअगोदर नवरदेवाला विवाहस्थळी नव्हे, तर स्मशानभूमीत नेऊन कपडे परिधान केली जातात. पूर्वजांचे स्मरण करुन त्यांचे आशिर्वाद घेत वैवाहिक आयुष्याला सुरवात करायची अशी धारणा या परंपरेमागील असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

गावात गणपती, हनुमान, राम, शनी अशी मंदिरे आहेत. विठ्ठल-रुखमाई मंदिर हे पेशवेकालीन असून तीन मजली मंदिर पूर्ण सागवानी लाकडातील आहे. एका मंदिरात गणपती आणि विठ्ठल-रुखमाई असे दोन मंदिरे आहेत. पावसात भिजूनही एक लाकूड खराब झालेले नाही. लाकडावर विविध देवी-देवतांचे कोरीव काम केले आहे. संत नामदेव महाराज, तुकाराम महाराज,शिवाजी महाराज, भीम-जरासंध युद्ध, श्री नृसिंह अवतार याचाही कोरीव कामांमध्ये समावेश आहे. मंदिराला ऐतिहासिक स्थळाचा दर्जा इतके सुंदर मंदिर आहे.

आजवरच्या आमदारांनी मंदिराला भेट दिली असली, तरीही सरकारचा दमडीचा निधी मंदिरासाठी उपलब्ध झाला नसल्याची ग्रामस्थांची खंत आहे. दोन तालुक्‍याच्या हद्दीवर साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असूनही मुख्य रस्त्याला गाव रस्ताने जोडला गेला नसल्याचे शल्य ग्रामस्थांच्या बोलण्यातून डोकावले. 
ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा वैशाख पौर्णिमेला भरते. यावेळी कुस्त्यांची दंगल रंगते. कीर्तनकार संजय महाराज देशमुख पंचक्रोशित परिचित आहेत. गावात स्वाध्याय परिवार व भजनी मंडळ आहे.

भिका बाबा मंदिरात भंडारा होतो. चैत्र पौर्णिमेला आंबाबाईची यात्रा भरते गावात. "दांडेकर ज्ञानेश्वरी'कार मामासाहेब दांडेकर यांच्या हस्ते शाळेचे उद्‌घाटन झाल्याची आठवण ग्रामस्थ सांगतात. शांतिगिरी महाराज आणि मोहनगिरी महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. गावातील सत्तर तरुण सैन्यदलात दाखल झाले आहेत. 
 
""मी गावात स्वखर्चाने पंचवीस देशी वडाची झाडे लावून त्याचे संवर्धन केले आहे. ही झाडे दहा फूट उंच झाली आहेत. सरकारच्या वृक्ष लागवड कार्यक्रमास माझा विरोध आहे. कारण दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. पण त्यातील जगतात किती हा खरा प्रश्‍न आहे. त्याऐवजी प्रत्येक गावात वीस झाडे देवून जो त्या झाडांचे संवर्धन करेल, त्याच्याच योजना मंजूर करायच्या अशी सक्ती केल्याशिवाय पर्यावरणाचा प्रश्‍न सुटणार नाही.'' 
-भानुदास उगले (सरपंच) 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com