अमळनेरला दोन हजाराची  लाच घेताना हवालदारास अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

अमळनेर : पोलिस ठाण्यातील समजुतीचा करारनामा करून देण्यासाठी दोन हजाराची लाच घेतल्याप्रकरणी हवालदार संजय पाटील एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृहाजवळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. या घटनेने शहरासह तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

तक्रारदार हे हरिपूरा (ता. यावल) येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मोठ्या भावाचा साखरपुडा मोडला असून, मुलीच्या पक्षाने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने दोन्ही पक्षांना समोर बोलावून समजुतीचा शुक्रवारी (ता. 2) करारनामा करण्यात आला. यात साखरपुड्यात झालेला 50 हजार रुपयांचा खर्च देऊन तडजोड करण्यात आली. या समजुतीचा करारनामा शंभर रुपयांच्या मुद्रांकावर करण्यात आला होता. या करारनाम्याची प्रत हवालदार संजय पाटील यांच्याकडे होती. याची नकल प्रत मिळण्याची मागणी तक्रारदाराने केली असता हवालदार पाटील यांनी त्यांच्याकडून दोन हजार रुपयाची मागणी केली होती.

तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. याअनुषंगाने लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक जी. एम. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शासकीय विश्रामगृहाजवळ सापळा रचला. यावेळी दोन हजार रुपये घेताना हवालदार पाटील यास पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणाने पोलिस खात्यासह, शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Marathi news north maharashtra bribe by constable