पाण्याच्या टाकीत पडून  दोन वर्षाच्या बाळाचा मृत्यू

Child dies
Child dies

खडकी बुद्रूक (चाळीसगाव) : घराच्या अंगणातील पाण्याच्या टाकीत पडल्याने पावणे दोन वर्षांच्या बाळाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी, येथील प्रगतिशील शेतकरी दत्तू गरबड लोहके यांच्या घराच्या अंगणात समांतर पाण्याची टाकी आहे. त्यांच्याकडे म्हशी असल्याने त्यांना पाणी पिण्यासाठीचा साठा त्यात असतो. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांच्या स्नुषा कविता लोहके या म्हशींना पाणी पाजवण्यासाठी उठल्या. यावेळी त्यांचा अंगणवाडीत जाणारा मुलगा ललित व पावणे दोन वर्षांचा पवन हे दोन्ही मुले घरात झोपलेले होते. घराच्या मागील भागात बांधलेल्या म्हशींना पाणी पाजण्यासाठी कविता या गेल्यानंतर त्यांचा पावणे दोन वर्षांचा मुलगा पवन हा झोपेतून उठला व अंगणात येत असताना घराच्या पायरीजवळील पाण्याच्या टाकीत पडला. हे घरातील कोणाच्याच लक्षात आले नाही.

काही वेळानंतर कविता या त्यांचा साडेचार वर्षांचा अंगणवाडीत जाणारा मोठा मुलगा ललित या उठवण्यासाठी गेल्या असता, त्याच्या जवळ झोपलेला पवन त्यांना दिसला नाही. त्यामुळे सर्वांनी त्याची शोधाशोध सुरू केली. दत्तू लोहके यांना आपला नातू पाण्याच्या टाकीत तर पडला नसावा म्हणून शंका आली व त्यांनी पाण्याने भरलेल्या टाकीत उडी मारली असता, पवन मिळून आला. त्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तातडीने चाळीसगावला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या घटनेमुळे खडकी गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com