एक्सप्रेस कालव्यात दोन भावांसह वडील वाहून गेले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

येवला : तालुक्यातील महालखेडा येथे नांदूरमध्यमेश्वर एक्सप्रेस कालव्याच्या वेगवान प्रवाहात शेतकरी कुटुंबांतील दोन भावांसह वडील असे तीघेजण वाहून गेले. कांद्याला फवारणी करण्याच्या पंपामध्ये पाणी भरण्यासाठी पाटामध्ये उतरलेला मुलगा वाहून चालला असता त्या मुलाला वाचवण्याच्या नादात त्याचा भाऊ व वडीलही त्याचेबरोबर वाहून गेले.

घटनास्थळापासून शोधकार्य सुरु करण्यात आले असून वाहून गेलेल्यांची नावे सोमनाथ शिवराम गिते, कार्तिक सोमनाथ गिते, सत्यम सोमनाथ गिते अशी आहेत. एक्सप्रेस कालव्याच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने शोधकार्यामध्ये अडचणी येत आहेत. कालव्याच्या प्रवाह बंद करण्यासह शोधाशोध करण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Marathi news north maharashtra news 3 dies sons and father water storage

टॅग्स