सटाणा महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न

रोशन खैरनार
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

सटाणा : आजच्या स्पर्धेच्या युगात ज्ञानात्मक गुणवत्तेला महत्व प्राप्त झाले आहे. सुजाण, सक्षम व सुसंस्कारीत पिढी घडविण्यासाठी शिक्षण संस्था ज्ञानाची उर्जापिठे म्हणून काम करीत असतात. जीवनातील कठीण आव्हाने पेलताना गुणवत्तेचा टिकाव लागतो. गुणवत्तेसाठी संधी, संस्कार आणि प्रोत्साहनाची आवश्यकता असते. त्यासाठी स्वसामर्थ्याची ओळख हा प्रगतीचा प्रारंभ असतो, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक डॉ.यशवंत पाटणे यांनी आज (ता. १७) येथे केले. 

सटाणा : आजच्या स्पर्धेच्या युगात ज्ञानात्मक गुणवत्तेला महत्व प्राप्त झाले आहे. सुजाण, सक्षम व सुसंस्कारीत पिढी घडविण्यासाठी शिक्षण संस्था ज्ञानाची उर्जापिठे म्हणून काम करीत असतात. जीवनातील कठीण आव्हाने पेलताना गुणवत्तेचा टिकाव लागतो. गुणवत्तेसाठी संधी, संस्कार आणि प्रोत्साहनाची आवश्यकता असते. त्यासाठी स्वसामर्थ्याची ओळख हा प्रगतीचा प्रारंभ असतो, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक डॉ.यशवंत पाटणे यांनी आज (ता. १७) येथे केले. 

येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना.म.सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे वक्ते म्हणून डॉ. पाटणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे उपसभापती राघोनाना अहिरे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे तालुका संचालक डॉ. प्रशांत देवरे, रामचंद्रबापू पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे, यशवंत अहिरे, प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे, लालचंद सोनवणे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष किशोर कदम, रोटरी क्लबचे सचिव प्रदीप बच्छाव, नगरसेवक राहुल पाटील आदी उपस्थित होते. 

डॉ. पाटणे म्हणाले, तारुण्याचा काळ हा प्रयोगशील आणि जागरूक राहण्याचा असतो. याच काळात ध्येय निश्चिती करून प्रयत्नांची पूजा बांधावी लागते. उज्वल भविष्याचा पाया हा तारुण्यातच रचला जातो. सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग माणसाच्या जवळ आले मात्र अतिरेकी चंगळवादामुळे जीवन सौंदर्य व संस्कृतीला तडे जातील अशा घटना घडत आहेत. शिक्षणातून स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असणारी पिढी निर्माण होण्यासाठी मुल्य संस्कारांची गरज असते. शाळा व महाविद्यालये हे संस्कार व ज्ञानरूपी डोळे देणारी केंद्रे झाली पाहिजेत, अशी अपेक्षाही डॉ.पाटणे यांनी व्यक्त केली. समाजोपयोगी उज्वल पिढी घडविण्याच्या कर्मवीरांच्या अपेक्षांची पूर्ती करताना महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखल्याचे संचालक डॉ.देवरे यांनी स्पष्ट केले. राघोनाना अहिरे यांचे भाषण झाले. 

प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थी प्रतिनिधी दिपेश्वरी देवरे हिने अहवालवाचन तर उत्कर्ष जाधव व श्रेयस टाटीया यांनी जिमखाना अहवाल वाचन केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास वाय.जी.कापडणीस, भिका सोनवणे, नगरसेवक महेश देवरे, दीपक पाकळे, वैभव गांगुर्डे, नाना मोरकर, उपप्राचार्य एस.एस.गुंजाळ, एन.डी.ततार, प्रा.संतोष शेलार, प्रा.एस.पी.कांबळे, प्रा.आर.डी.वसईत, प्रा.टी.आर.हिरे, प्रा.सुनील बागुल, प्रा.के.आर.खंदारे, प्रा.पी.डी.भदाणे, प्रा.प्रफुल्ल ठाकरे, प्रा.सुनील पाचंगे, प्रा.एन.आर.पवार, प्रा.संदेश गायकवाड, प्रा. पल्लवी खैरनार, प्रा.तृप्ती काकुळते, प्रा.एस.व्ही.घरटे आदींसह प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा.कल्पना पाटील व प्रा. प्रिया आंबेकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.सुनील सैंदाणकर यांनी आभार मानले. 

Web Title: Marathi news north maharashtra news satana college