वैशाली सोर यांच्या दीर्घकाव्याची इंडिया ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Vaishali
Vaishali

नांदगाव : इंडिया बुक ऑफ रेकार्ड मध्ये दीर्घ काव्य सादरीकरणात वेगळ्या प्रकारची नोंद प्रस्थापित करण्याचा बहुमान नांदगावच्या सुनबाईने मिळविला आहे. शहरातील महिलेचा अशा पद्धतीने बहुमान मिळविण्याची हा पहिलाच प्रसंग आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश सोर व माधवी सोर यांच्या थोरल्या स्नुषा वैशाली तुषार सोर-वाघमौड़े यांनी मराठी काव्यातील दीर्घ काव्य सादरीकरणात स्त्री विषय निवडताना स्त्रीच्या भावनांचे परिणामकारक आशयघनता साधणारे अशा प्रकारचे काव्य सादर केले.

त्यासाठी त्यांनी 3229 शब्दांचा व 949 ओळीचा अचूक योजकतापूर्वक वापर या दीर्घकाव्यात करताना आशयाला कसलाही धक्का लागू दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या या रचनेतून स्त्रीचा संपूर्ण जीवनपटावरचा प्रवास अधोरेखीतच झालाय. स्त्रीच्या अंतर्मनातील व्यक्त अव्यक्त भावभावनांना शब्दात वेगळ्या धाटणीने मांडण्याचा प्रयत्न या दीर्घकाव्यात केला गेल्याने त्याची नोंद घ्यावी लागली.

लहानपणापासूनच कविता करण्याचा छंद जपणाऱ्या वैशालीने यापूर्वी शालेय तसेच महाविद्यालयीन अध्ययनाच्या काळात भित्तीपत्रके, नियतकालिके अशा माध्यमातून लिहलेल्या कविता सादर केल्यात. अर्थात नवोन्मेषाली प्रतिभेचा हा अंकुर फुलविण्यासाठी कुटुंबाची साथ देखील तिला वेळोवेळी लाभत गेली. त्यातून आकाराला आला तो दीर्घकाव्याचा प्रयोग त्याला इंडिया बुक ऑफ रेकार्डने व्यासपीठ उपलबध करून दिल्याने पहिल्याच प्रयत्नाला मिळालेल्या या प्रोत्साहनामुळे वैशालीच्या प्रतिभेचे चीज झाले आहे. त्यांच्या

या दीर्घकाव्याला दाद देणारी संस्था इंडिया बुक ऑफ रेकार्ड या नामांकित संस्थेने दखल घेत भारतातील सांस्कृतिक पैलूंचा समावेश असलेल्या 2018 च्या नोंदसंग्रहात या दीर्घकाव्याचा समावेश केला आहे वैशाली गृहिणी असून देखील तिने आपल्यातील प्रतिभेला अशा आगळ्या पद्धतीने जपले आहे. वैशाली सोर यांच्या या यशाबद्दल आमदार पंकज भुजबळ माजी आमदार  अॅड. अनिल आहेर, नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी नगराध्यक्ष भास्कर कदम, शिवाजी पाटील, जेष्ठ विधिज्ञ अॅड. युनूस शेख, अशोक पारखे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे अॅड सचिन साळवे आदी विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com