कामकाजात झिरो पेन्डसीचा अंमल व्हावाः माने 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नाशिक : लोकांची प्रशासकीय कामे लवकर मार्गी लावण्यासाठी प्रत्येक विभागाने झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल कार्यपद्धतीचा काटेकोरपणे अवलंब करावा.असे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले. 

विभागीय आयुक्त कार्यालयात झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल यासाठी विभागीय आयुक्तांनी कार्यशाळा घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, अपर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, सुखदेव बनकर, प्रविण पुरी आदी उपस्थित होते. 

श्री. माने म्हणाले, शून्य प्रलंबितता व रोजच्या कामाचा वेळेत निपटारा होण्यासाठी अधिकाऱ्यांनी निर्णय प्रक्रिया वेगाने राबवावी तसेच कागदपत्रांचे जतन योग्य पद्धतीने 
करण्यात यावे, संगणक प्रणालीचा आधिक प्रमाणात वापर करावा. कार्यालयीन अभिलेख्यांसोबतच संगणकीय माहितीचे व्यवस्थापन आणि जतन योग्यपद्धतीने करावे

अधिक डेटा उपयोग करणाऱ्या विभागांनी त्यासाठी आवश्‍यक यंत्रणा तयार कराव्यात. झिरो पेन्डन्सी हे एक अभियान किंवा मोहीम म्हणून न राबविता एक स्थायी स्वरूपाची व्यवस्था म्हणून कायमस्वरूपी राबवाबी. यासाठी कार्यालयात सामुहिकरित्या जबाबदारी पार पाडतांना विभाग प्रमुखांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. 

तत्पूर्वी उपायुक्त दिलीप स्वामी म्हणाले की, झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल या कार्यपद्धती व तिच्या अमंलबजावणी विषयी माहीती दिली. कार्यपध्दतीमुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढून प्रशासकीय कामात पारदर्शकता व सुटसुटीतपणा येईल. जुन्या अभिलेख्यांची वर्गवारी आणि अद्ययावतीकरणासाठी अ,ब,क,ड वर्गीकरण व अभिलेख कक्षाचे सहा गठ्ठे पद्धती अद्ययावतीकरणावर लक्ष देण्याच्या सूचना केल्या.

प्रत्येक प्रकरण विहित मुदतीत पूर्ण करून त्याचा अहवाल वेळेवर सादर करावा. यामुळे कार्यालयीन कामकाजात सोपेपणा येण्याबरोबर जनतेच्या समस्या वेळेत सुटण्यासाठी कार्यालय प्रमुखांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. उपायुक्त रघुनाथ गावडे यांनी शासन निर्णयाची माहीती दिली. तहसिलदार बबन काकडे यांनी आभार मानले. 

Web Title: marathi news officer workshop