राजकिय प्रचारसभा उधळण्याचा कांदा  उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नाशिक ः राज्यात सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी कांदा उत्पादकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा 
निवडणूकीत सत्ताधारी व विरोधकांच्या प्रचारसभा कांदा उत्पादक शेतकरी संघटना उधळून लावेल. असा इशारा देण्यात आला. 

   कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील कांदा उत्पादकांच्या प्रश्‍नाची तीव्रता वाढण्याला सत्ताधारी व विरोधी पक्ष असे दोघे जबाबदार आहे. सध्याचे विरोधत राज्यात सत्तेत असतांना त्यांनी कांद्याचा प्रश्‍न सोडविला नाही. आता सत्तेत आलेल्या भाजपला कांद्याच्या प्रश्‍नाच्या सोडवणूकीत 
रस नाही. असा आरोप कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे खंडेराव दिघोळे, अतुल गीते, नितीन दिघोळे, सतीश दिघोळे आदीनी हा इशारा दिला. दिघोळे म्हणाले की, राज्यात अडचणीतील शेतकऱ्यांसाठी कांदा पीक हे उदरनिर्वाहाचे प्रमुख नगदी पीक आहे, कांद्याची निर्यात करुन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो.पण शासनाकडून कांद्याच्या निर्यातीकडे दुर्लक्ष होते. ड दर्जाचा कांदा विकला जातो पण चांगल्या दर्जाच्या कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे कांदा उत्पादकांना 2 हजार रुपये क्विटल हा हमी भाव मिळाला पाहिजे

Web Title: marathi news onion farmer association