कांदा दरवाढीचा निषेध करणाऱ्यांविरोधात आंदोलन....जोरदार घोषणाबाजी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

लासलगाव : देशांतर्गत कांद्याच्या वाढलेल्या दराचा फटका शहरी भागातील ग्राहकांना बसल्यानंतर शहरी भागातील गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मोठा गाजावाजा करत विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून कांदा दरवाढीचा निषेध करत आंदोलने केली. या आंदोलनाच्या निषेधार्थ लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर राज्य कांदाउत्पादक शेतकरी संघटनेने कांद्याची निर्यातबंदी, व्यापाऱ्यांच्या साठ्यावर असलेले निर्बंध उठविले पाहिजेत, कांद्याची आयात थांबवली पाहिजे, अशा घोषणा देत निषेध आंदोलन केले. 

सारेच जण रस्त्यावर

लासलगाव : देशांतर्गत कांद्याच्या वाढलेल्या दराचा फटका शहरी भागातील ग्राहकांना बसल्यानंतर शहरी भागातील गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मोठा गाजावाजा करत विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून कांदा दरवाढीचा निषेध करत आंदोलने केली. या आंदोलनाच्या निषेधार्थ लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर राज्य कांदाउत्पादक शेतकरी संघटनेने कांद्याची निर्यातबंदी, व्यापाऱ्यांच्या साठ्यावर असलेले निर्बंध उठविले पाहिजेत, कांद्याची आयात थांबवली पाहिजे, अशा घोषणा देत निषेध आंदोलन केले. 

सारेच जण रस्त्यावर

आंदोलनात राज्य कांदाउत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, शैलेंद्र पाटील, वसंत गांगुर्डे, कैलास पगारे, बाळासाहेब थोरे, गणेश निंबाळकर, जयराम गामणे, भाऊसाहेब केदार, संदीप मगर, बाळासाहेब आव्हाड व कांदाउत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. 
क्‍यार चक्रीवादळामुळे जोरदार अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. लाल कांद्याची आवक मंदावली. परिणामी कांद्याच्या दरात वाढ झाली. उन्हाळ कांद्याची आवक संपुष्टात आल्याने कांद्याच्या दराने होलसेल दरात शंभरीचा टप्पा पार केला. रिटेल बाजारात 200 रुपये प्रतिकिलोने कांदाविक्री होण्यास सुरवात झाली.

नक्की वाचा- देशवाचविण्यासाठी आता लढाई करावी लागेल

बाहेरूनही चांगला प्रतिसाद

दिल्ली, मुंबईसह मोठ्या शहरांत कांद्याचे दर कमी करण्यासाठी राजकीय पक्षांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून संसद भवन व रस्त्यावर आंदोलने केली. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने इजिप्त व तुर्की या देशांतून 21 हजार टन कांदा आयातीचा निर्णय घेतला. कांदा व्यापाऱ्याला 25 टन, तर रिटेल व्यापाऱ्याला दोन टनाचे निर्बंध घातले. यामुळे कांद्याच्या दरात रोज घसरण होण्यास सुरवात झाली. याचा फटका कांदा उत्पादकांना बसला. शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी राज्य कांदाउत्पादक शेतकरी संघटनेने लासलगाव कांदा बाजार आवाराच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांसह निषेध आंदोलन केल्याचे राज्य कांदाउत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले. 

नुकसान मोठेच
कांद्याला मिळणारे दर दीर्घकाळ राहत नाहीत. कांदा बाजारपेठेत येईपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागते. कांदा उत्पादनासाठी येणारा खर्च पाहता बहुतांश वेळा गुंतलेले भांडवल मिळत नाही. अशा वेळी दर वाढवून मिळावा म्हणून कोणीही पुढे येत नाही. महागाई वाढत असताना कांद्याचे दर कधीतरी वाढले, तर लगेच ओरड होते, हे चुकीचे आहे. त्यास वाचा फोडण्यासाठी आंदोलन केले. 

सव्वा एकरात केवळ 160 किलो कांदा 

आडगाव रेपाळ (ता. येवला) येथील शेतकरी सीताराम निकम यांनी सव्वा एकर क्षेत्रात लाल कांद्याची लागवड केली होती. अवकाळी पावसामुळे संपूर्ण कांद्याचे नुकसान झाले. त्यांनी 70 ते 80 हजार रुपये खर्च केला. त्याच्यातून फक्त 160 किलो कांदा निघाल्याचा दावा त्यांनी केला. आजचा बाजारभाव पाहता, या कांद्याचे त्यांना पाच ते सहा हजार रुपये मिळणार असल्याने कर्ज कसे फेडावे आणि कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news onion seller andolan