देश वाचविण्यासाठी संघर्ष करावा लागेल, आता आर-पारची लढाई : सोनिया गांधी

वृत्तसंस्था
Saturday, 14 December 2019

देशात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. आपल्याला कठोर संघर्ष करावा लागणार आहे. शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत, त्यांनाही वाचविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना साध जीवन जगणेही कठीण झाले आहे. तरुणाईच्या हातातले रोजगार जात आहेत, बेरोजगारीचे संकट आहे. शेतकरी, कामगारांच्या जीवनात बदल आणणे गरजेचे आहे.

नवी दिल्ली : देशाला वाचविण्यासाठी आपल्याला कठोर मेहनत घेणे गरजेचे आहे. आता आर-पार लढाईची वेळ आली आहे. आज अशी परिस्थिती आहे, की सर्वसामान्य आपला पैसा न घरी ठेवू शकत न बँकेत, अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर आक्रमक होत काँग्रेसकडून आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात 'भारत बचाओ' रॅलीचे आयोजन केले होते. दिल्लीत रामलीला मैदानावर 'भारत बचाओ रॅली' घेण्यात आली. या रॅलीद्वारे काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी!; मरण पत्करेन पण...

सोनिया गांधी म्हणाल्या, की देशात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. आपल्याला कठोर संघर्ष करावा लागणार आहे. शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत, त्यांनाही वाचविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना साध जीवन जगणेही कठीण झाले आहे. तरुणाईच्या हातातले रोजगार जात आहेत, बेरोजगारीचे संकट आहे. शेतकरी, कामगारांच्या जीवनात बदल आणणे गरजेचे आहे. छोटे-मोठे व्यापारी उद्ध्वस्त झाली आहे. अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले आहे. काळापैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीसारखा निर्णय घेतला, पण तो काळापैसा बाहेर आलाच नाही. सबका साथ, सबका विकास कुठे आहे? जीएसटीमुळे देशाची तिजोरी रिकामी झाली. अंधेर नगरी, चौपट राजा अशी देशाची परिस्थिती झाली आहे. युवकांसमोर सध्या अंधारच अंधार आहे. मोदी-शहा यांचे एकच लक्ष्य आहे, लोकांमध्ये भांडणे लावणे आणि मुळ मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणे. काँग्रेस कायम लढाई लढत आलेली आहे, आम्ही कधीच माघार घेऊ शकत नाही. मोदी सरकारच्या निर्णयांची चौकशी झाली पाहिजे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशाचे विभाजन होईल.

आपल्याला हा देश वाचवायचा आहे : प्रियांका गांधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress President Sonia Gandhi attacks BJP on Bharat Bachao rally in Delhi