नांद्रासह कुरंगीतील सातही बोरवेल पाण्याअभावी कोरडे! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

नांद्रा (ता. पाचोरा) ः परीसरातील नांद्रा येथे दोन तर कुरंगी येथे पाच हॅन्डपंप इंधन विहिरी या मंजूर झालेल्या होत्या. शासनस्तरावरील टंचाई काळातील यंत्रणा स्तरावरील करण्यात येणाऱ्या उपाय योजनेत या हॅन्डपंपाचा समावेश होता. परंतु या परीसरात पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे नांद्रा व कुरंगी येथे करण्यात आलेल्या 200 फुटावरील बोरवेल कोरडे ठाक आहेत. 

शासनाने दोनशे फुटापेक्षा जास्त बोरवेल केले गेले पाहिजेत. भर उन्हाळ्यात जमिनीत दोनशे फुटांवर कोणत्याही प्रकारचे पाण्याचे स्रोत नसल्यामुळे हे बोरवेल रिकामे आहेत. परीसरातील अपुर्ण असलेल्या नांद्रा व बांबरुड (राणीचे) येथील पेयजल योजनेचे कामे अपुऱ्या असल्यामुळे या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नांद्रा येथील बोरवेलच्या कामाचे पुजन उपसरपंच बाळू बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच शिवाजी तावडे, ग्रा.प. सदस्य प्रा. यशवंत पवार, योगेश सुर्यवंशी, रविकांत सुर्यवंशी, साहेबराव साळवे, सखाराम पाटील, संजय बाविस्कर, नाना सुर्यवंशी उपस्थित होते. कोरडे गेलेल्या बोरवेलबाबत बोलतांना शिवाजी तावडे यांनी शासनाने या बाबतीत परीपत्र बदलून दोनशे फुटापेक्षा जास्त खोलीच्या बोरवेलला मंजूरी देण्याची मागणी केली. भर उन्हाळ्यात टंचाईच्या काळातील करण्यात येत असलेल्या रिकामे बोअरमुळे पैसा वाया जात असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

टंचाईच्या कृती आराखड्यानुसार ग्रामपंचायतीने मागणी केलेल्या कामातील यंत्रणा स्तरावरील ह्या हॅंन्डपंपाचे कामे दोनशे फुटापर्यतच करता येतात. ह्या दिवसात फारच कमी ठिकाणी पाणी लागते. मागणीनुसार हे कामे करण्यात येत आहे. 
- आर. बी. वानखेडे, शाखा अभियंता, पाणीपुरवठा पाचोरा. 

Web Title: marathi news pachora boare water