सहा महिन्यात ‘मैत्रेय’च्या ठेवींचा परतावा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

पाचोरा ः ‘मैत्रेय’मध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांना येत्या सहा महिन्यात त्यांच्या पैशांचा परतावा करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असून मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा व निर्णय झाले आहेत. ज्या ठेवीदारांनी पोलिसात याबाबत नोंदणी केली आहे. त्यांच्याच बँक खात्यात पैसे जमा होतील. ज्यांनी नोंदणी अजूनही केली नसेल त्यांनी जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात योग्य ती कागदपत्रे सादर करून नोंदणी करावी, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे. 

‘मैत्रेय’मधील गुंतवणुकीसंदर्भात झालेला गैरव्यवहार व ठेवीदारांचा विश्वासघात हा विषय सध्या सर्वत्र गाजत असून आमदार किशोर पाटील यांनी या विषयाकडे लक्ष वेधून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पोलीस व महसूल विभागाच्या सहकार्याने ठेवीदारांना पैसे परत मिळवून देण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई येथे आतापर्यंत अनेकदा बैठका झाल्या. त्याआधारे पोलीस अधिकाऱ्यांनी ‘मैत्रेय’च्या मालमत्ता सर्च केल्या आहेत. राज्यातील ४२५ मालमत्ता सर्च झाल्या असून ‘मैत्रेय’कडे सुमारे २ हजार २०० ते २ हजार ५०० कोटी घेणे आहे. त्यापेक्षा या मालमत्तांची किंमत जास्त आहे. त्यामुळे ठेवीदारांना पैसे परत मिळणे शक्य असल्याचे सांगून राज्यभरात सुमारे ४९ लाख ठेवीदारांच्या ठेवी धोक्यात आलेल्या असताना आतापर्यंत फक्त १७ लाख ठेवीदारांनी पोलिसांकडे नोंदणी केली आहे. ‘मैत्रेय’च्या मालमत्ता सर्च करून व त्या एकत्रित करून त्यांच्या लिलावासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली जाईल व पैशांचा परतावा करण्यासंदर्भातील हालचाली सुरू असताना ज्या मालमत्ता अतिशय महत्त्वाच्या (क्रिम मालमत्ता) आहेत, त्या राज्य सरकारनेच आपल्याकडे ठेवाव्या व नोंदणी केलेल्या ठेवीदारांच्या बँक खात्यात पैसे जमा करावेत, असा प्रस्ताव गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. ते या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रक्रियेला पोलीस व महसूल विभागासह मंत्री महोदयांकडून गती दिली जात असल्याने ठेवीदारांना ‘मैत्रेय’च्या ठेवी परत मिळण्याची ही पहिलीच घटना ठरेल, असा आशावादही आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora maitray tevi six month