Vidhan sabha : अहो, आश्चर्यम...! स्मशानभूमीत कॉर्नर सभा 0

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पाचोरा ः निवडणूक म्हटली म्हणजे त्यात विविध प्रकारचे चांगले- वाईट, साधक- बाधक प्रकार घडत असतात. त्यांची दखल घेतली जात नसली तरी अशा विविधांगी प्रकारांमुळे निवडणुकीचा रंग जास्तच रंगतदार होऊन तो चौफेर उधळला जातो. असाच काहीसा प्रकार पाचोरा येथे अनुभवायला मिळाला असून चक्क स्मशानभूमीत कॉर्नर सभा घेण्यात आल्याने या सभेसंदर्भात साधकबाधक चर्चेला उधाण आले आहे. 

शिवसेनेतर्फे शहरातील बाहेरपुरा भागातील स्मशानभूमीच्या प्रांगणात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, माजी उपनगराध्यक्ष बंडू चौधरी, नगरसेवक सतीश चेडे, दादाभाऊ चौधरी, रहेमान तडवी, वाल्मीक पाटील, जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, पप्पू राजपूत यांची उपस्थिती होती. या कॉर्नर सभेला परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मुस्लिम बांधवांनी आपापली मते मांडली. सभेत आमदार किशोर पाटील यांनी मतदारसंघात गेल्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या विक्रमी विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यात आला. पितृपक्षात चक्क स्मशानभूमीत घेण्यात आलेली ही कॉर्नर सभा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली असून त्याबाबत खमंग चर्चा रंगत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora smashan bhumi corner sabha