पैशांच्या वादातून एकाचे अपहरण, दोघांविरोधात गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

नाशिक : उसनवार घेतलेले साडेबारा लाख रुपये न दिल्याच्या कारणावरून मध्यप्रदेशातील दोघांनी इंदिरानगरमधील इसमाला मारहाण करून त्याचे अपहरण केले आणि डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हे अपहृत इसमाच्या ओळखीतील असून आर्थिक नुकसानीमुळे इसमाला पैसे देणे न जमल्याने सदरचा प्रकार घडल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. दीपक जौ, सोनू जैन असे दोघा संशयितांची नावे आहेत. 

  रमेशसिंह डोंगरसिंह सोलंकी (38, रा. शिवकृपा रो-बंगलो, फ्लॅट नं. 107, समर्थनगर, पाथर्डी रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, तो गेल्या काही महिन्यांपूर्वी सहारा कंपनीत कामाला होता. मात्र कंपनी बंद पडल्याने रमेशसिंह सोलंकी यांचे वैयक्तिक आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. दरम्यान, रमेशसिंह सोलंकी यांनी संशयित दीपक शांतीलाल जैन व सोनू नैन (दोघे रा. पिपल्या बुजुर्ग, ता. महेश्‍वर, जि. खरगोन, मध्य प्रदेश) यांच्याकडून काही महिन्यांपूर्वी लाखो रुपयांची रक्कम उसनवार घेतली होती. घेतलेल्या रकमेतील काही पैसे सोलंकी यांनी दीपक जैन व सोनू नैन यांना परत केले आहेत. मात्र यातील 12 लाख 60 हजार रुपये घेणे बाकी होते.

   हेच पैसे घेण्यासाठी दोघा संशयितांनी गेल्या गुरुवारी (ता.10) रात्री साडेनऊ वाजता शहरातील वडाळा-पाथर्डी रोडवरील मेट्रो झोन मंदिरासमोरील रामेश्‍वर मंदिर येथे रमेशसिंह सोलंकी यांना भेटण्यास बोलाविले. त्याठिकाणी संशयितांनी शिवीगाळ व मारहाण करीत त्यांना बळजबरीने आपल्या अल्टो कारमध्ये बसविले आणि त्यांचे अपहरण करून डांबून ठेवले होते. घटनेनंतर रमेशसिंह सोलंकी यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठत दोघा संशयितांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
Web Title: MARATHI NEWS PAISA VAD