रोकड पळविण्याच्या प्रयत्नात महिला गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

रोकड पळविण्याच्या प्रयत्नात महिला गंभीर जखमी
नाशिक : पावणे तीन लाखांची रोकड घेऊन मोपेड दुचाकीवरून घराकडे परतणाऱ्या महिलेची लुट करण्याचा प्रयत्न पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला. परंतु, महिलेने रोकडची पिशवी पकडून ठेवल्याने संशयितांचा प्रयत्न असफल झाला असला तरी या झटापटीमध्ये महिला दुचाकीवरून पडल्याने गंभीररित्या जखमी झाली आहे. सदरची घटना काल (ता.14) दुपारी पुणा रोडवरील कामट हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी अज्ञात संशयितांविरोधात मुंबई नाका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्षशिला चंद्रशेखर गायकवाड (रा. पार्क साईड रेसीडेन्सी) या त्यांच्या आई शिला चंद्रशेखर गायकवाड यांना घेऊन मोपेड दुचाकीवरून (एमएच 15 एफआय 0061) पुणा रोडवरील स्टेट बॅंकेत गेल्या. तेथून त्यांनी बॅंक खात्यातून 2 लाख 70 हजार रुपये काढले आणि ती रक्कम मर्चण्ट बॅंकेत भरण्यासाठी परत पुणा रोडने द्वारकेकडे येत होते. दुपारी साडेबारा पाऊण वाजेच्या सुमारास मोपेड दुचाकीवरून दोघी हॉटेल कामतसमोर आले असता, पाठीमागून पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शिला गायकवाड यांच्या हातातील 2 लाख 70 हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकाविण्याचा प्रयत्न केला. सदरची बाब लक्षात येताच तक्षशिला गायकवाड यांनी दुचाकीचा वेग कमी केला. तर संशयित हिसकावित असलेली रक्कमेची पिशवी शिला गायकवाड यांनी घट्ट पकडल्याने त्यांना ती सहज हिसकावता आली नाही. त्यातच तक्षशिल यांनीही पिशवी पकडली. त्यामुळे दुचाकीवरून पाठीमागे बसलेला संशयित खाली पडला. तर मोपेडवरून शिला गायकवाड याही दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. 
अवघ्या काही क्षणामध्ये झालेल्या या प्रकारामुळे दुचाकीस्वाराने पोबारा केला तर खाली पडलेला संशयितही अखेर पायीच पळून गेला. तक्षशिला यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पावणे तीन लाखांची रोकड वाचली परंतु, त्यांची आई शिला गायकवाड या दुचाकीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पुणा रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना आदेश केले. त्यानुसार, पल्सर दुचाकीवरून आलेल्या संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
Web Title: MARATHI NEWS PAISE LOOT